Thursday, June 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी – मुनगंटीवार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 30, 2024
in top news
0
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार – मुनगंटीवार
0
SHARES
50
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई, 30 जून, (हिं.स.) : ‘हेचि दान देगा देवा…तुझा विसर न व्हावा’….विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

वारकऱ्यांचे प्रबोधन करावे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत दोन चित्ररथ आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. या चित्ररथाचा प्रारंभ मंत्रालय प्रांगणातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. वारीत आस्था, अस्मिता आणि परंपरा घेऊन जाण्याचे काम आपले कलापथक करीत असल्याचा आनंद व्यक्त करीत वारीत जाणाऱ्या कलाकारांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे, विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, इतरांनी हेवा करावा अशी राज्याची परंपरा आहे. वारकऱ्यांचे भाव पाहिले की कळते जगात सर्वात सुखी वारकरी आहेत. आस्था आणि अस्मितेचे प्रतिक असलेल्या पंढरपूरच्या वारीला वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळावे यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरपूरची वारी होय. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी देशातून आणि परदेशातून भक्त येत असतात. या चित्ररथांद्वारे संत सखू, संत निर्मला, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत महदंबा या स्त्री संतांची महती त्यांच्या अभंगांद्वारे भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पोवाडा, पथनाट्य आणि भारूड या कलाप्रकारांच्या माध्यमातून भक्तगणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच पुणे येथून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजना, आपत्ती आल्यास घ्यावयाची काळजी, शासकीय मदत यासंदर्भातील माहिती चित्ररथामार्फत देण्यात येणार आहे.

“कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण…नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा….या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला” या संत केशवदास यांच्या रचनांवर कलापथकाने सादरीकरण केले. ‘ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय’ या गजरात मंत्रालय परिसर दुमदुमला होता. पृथ्वी थिएटरच्या कला पथकातील २४ कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले. शाहीर यशवंत जाधव यांनी अभंग सादर केले.

Post Views: 48
Previous Post

छ. शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार, मुनगंटीवार यांचे निवेदन

Next Post

राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख, निर्माते रुमी जाफरी यांचा सन्मान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख, निर्माते रुमी जाफरी यांचा सन्मान

राज्यपालांच्या हस्ते कला दिग्दर्शक जयंत देशमुख, निर्माते रुमी जाफरी यांचा सन्मान

ताज्या बातम्या

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी; खा. प्रणिती शिंदे यांना साकडे

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी; खा. प्रणिती शिंदे यांना साकडे

June 18, 2026
वस्तूंवर उत्पादन मूल्य छापा; ग्राहक पंचायतीचे सत्याग्रह आंदोलन

वस्तूंवर उत्पादन मूल्य छापा; ग्राहक पंचायतीचे सत्याग्रह आंदोलन

June 18, 2026
जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी !

जिल्हा रुग्णालयात कर्करोगाची पहिलीच अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी !

June 18, 2026

नशामुक्त भारत अभियानांतर्गत ‘विकसित भारत की पहचान’ उपक्रमास प्रारंभ

June 18, 2026

एमएसएमई दिनानिमित्त वाशी येथे 27 जून रोजी शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळा

June 18, 2026

एन निनो’ च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

June 18, 2026

कुणबी जात प्रमाणपत्रासाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन

June 18, 2026
अधिकमासानिमित्त उपळे दुमाला येथील सहारा वृध्दाश्रमास मदत

अधिकमासानिमित्त उपळे दुमाला येथील सहारा वृध्दाश्रमास मदत

June 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0917616

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697