मंठा येथील उपजिल्हा रुग्णालया करीता आमदार लोणीकर यांच्या विशेष प्रयत्नातून ५० कोटी रु. ची प्रशासकीय मान्यता
रुग्णालयाचे मुख्य इमारत बांधकामा करीता रु.२७.१० कोटी तर अधिकारी/कर्मचारी निवासस्थान बांधकामा करीता रु.२२.६० कोटी
===============================
चौकट- 1
मंठा येथील शासकीय रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊन सुमारे ५० कोटी रुपये निधी ची प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे आभार मानले आहे.
===============================
चौकट – 2
महाराष्ट्र राज्याचे माजी, तसा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत हाय पावर कमिटीची बैठक मुंबई मंत्रालयात झाली होती. या बैठकीत मंठा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा व निधीस मंजुरी मिळाली होती. त्यास आता प्रशासकीय मान्यता मिळाली असून. लवकरच टेंडर होऊन बांधकामास सुरुवात होईल.
===============================
जालना / प्रतिनिधी
मंठा तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय उपचार घेण्याकरिता जालना येथील शासकीय रुग्णालयात जावे लागत होते. यात खास करून महिला रुग्णांची हेळसांड होत होती. या मुळे मंठा येथील शासकीय रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून अद्यावत सोयी सुविधा मंठा तालुक्यातील नागरिकांना मिळाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांनी डिसेंबर 2023 मध्ये नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी द्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. या अनुषंगाने आमदार लोणीकर यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना सतत भेटून पत्र देऊन याबाबतीत पाठपुरावा केला होता.
आमदार बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाला असून मंठा जिल्हा जालना येथील ३० खाटांवरुन ५० खाटांच्या श्रेणीवर्धीत उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य इमारत बांधकामाच्या रु.२७.१० कोटी व अधिकारी/कर्मचारी निवासस्थान बांधकामाच्या रु.२२.६० कोटी अशा एकूण ५० कोटी रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास केंद्र व राज्य सरकार ने प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच मंठा येथील शासकीय रुग्णालय अद्यावत सोयी सुविधांनी सज्ज होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कर्तव्यदक्ष आमदार बबनराव लोणीकर यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात दिली आहे.