बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळावा संपन्न!
लोकनेते काकासाहेब चौधरी माध्यमिक विद्यालय तांदुळवाडी ता.वाशी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष व सचिव होते कार्यक्रमासाठी तांदुळवाडी, शेंडी, जवळका, येथील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे माजी विद्यार्थी निखिल कुलकर्णी व तुषार चौधरी यांनी नीट परीक्षेत यश प्राप्त केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
नंतर एस.एस.सी बोर्ड परीक्षा २०२४ मध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी कल्याणी ढगे १५०१ रुपये, शुभम गाढवे १२०१ रुपये तर संजना कुलकर्णी १००१ रुपये तसेच चतुर्थ क्रमांक अंकिता पवार व शिवकन्या गाढवे यांचाही शाल श्रीफळ ट्रॉफी व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष मुख्याध्यापक व शिक्षकांची मार्गदर्शन परभाषणे झाली. कार्यक्रमासाठी गावातील पालक व शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.