मुदखेड ता प्र
दि. ८ जुलै रोजी तहसील कार्यालय मुदखेड येथे दिव्यांग बांधवांचे हेळसांड होतं असल्या मुळे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
तहसीलदार व तहसील कर्मचारी अधिकारी यांना प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने अनेक दिव्यांग योजनेबद्दल विचार पुस करण्यात आली असून मुदखेड तहसील कार्यालयात जुन्या पध्दतीचे नियमितपणे कामे केली जात होती ती कामे त्याचं पध्दतीने ठेवण्यात यावी तुम्ही काढलेले नियम तात्काळ बंद करावे असे सर्वांनाच्या उपस्थितीत सांगण्यात आले संजय गांधी निराधार योजनेचे श्रावण बाळ योजनेचे मानधन वेळेवर देण्यासाठी सुध्दा सुचना करण्यात आले..
तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांच्या योजना व्यवस्थित राबविण्यात यावेत अन्यथा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने पुंगी बजाव मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. व शासनाने परिपत्र नियमावली काढली त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात कामे करावीत असे सुद्धा निवेदनात नमुद केले आहे.
तहसिलचे कर्मचारी व अधिकारी दिव्यांग बांधवांना उडवाउडवीची उत्तरे दिली जाताना दिसत असल्याने हा पुढील पाऊल उचलले आहे
यापुढे तालुक्यातील दिव्यांग,व निराधार महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नियम पाळा अन्यथा प्रहार दिव्यांग संघटना आपल्या स्टाईलने तहसील कार्यालयावर जांब विचारना केल्या शिवाय गप बसणार नाही.
यापुढे असा प्रकार दिसून आल्यास मोर्चाचे आयोजन केल्याशिवाय प्रहार दिव्यांग क्रांती संघटना चुप बसणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी उपस्थित प्रहार तालुका प्रमुख अनिल पा.शेटे, शंकर पा.शिंदे,
महिला अध्यक्षा केशरताई शंकरराव शिंदे, प्रहार उपाध्यक्ष दिलिप पा. शिंदे, तालुका सचिव साहेबराव निवडंगे, यासह प्रहार महिला भगिनीं व प्रहार कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.