परतुर :प्रतिनिधी
येथील चि.प्रसाद तुकाराम उबाळे यांची वैज्ञानिक सहाय्यक म्हणून, निवड झाल्याबद्दल व ऐश्वर्या तनपुरे विधिज्ञ झाल्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. दृष्टी लायन्स क्लब परतुर येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी दृष्टी फौंडेशन सदस्य व लॉयन्स क्लब च्या माजी सचिव ताराताई उनमुखे या होत्या या सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना लॉयन्स क्लब ऑफ परतूर चे संस्थापक अध्यक्ष पी एम जे एफ लॉयन श्री मनोहर खालापूरे यांनी विद्यार्थ्यांना विविध संधी व क्षेत्र उपलब्ध असून आपला कल व आवड ओळखून त्यात यश संपादन करावे
तसेच पालकांनाही आपल्या मुलांना प्रोत्साहन दयावे जेणे करून ते विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील
या प्रसंगी प्रसाद उबाळे व ऐश्वर्या तनपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी लॉयन्स क्लब चे अध्यक्ष लॉयन प्रमोद टेकाळे कोशाध्यक्ष लॉयन मधुकर भोसले रेवती राखे डॉक्टर संदीप चव्हाण संजीवनी खालापुरे कान्होपात्रा बोराडे सुनीता बोराडे ज्योती उबाळे बबन उनमुखे संतोष शिंदे,तुकाराम उबाळे ,गणेश बोराडे प्रशांत पुरी मसलकर नवनाथ तनपुरे चंद्रकांत गाडेकर लॉयन्स सदस्य दृष्टी लॉयन्स कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.