खानापुर जिल्हा परिषद शाळेत
वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षिसातून उभारलेल्या कमानीचे लोकार्पण.
तभा वृत्तसेवा
टेंभुर्णी / प्रतिनिधी
खानापूर ता.जाफराबाद येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षिसातून
उभारण्यात आलेल्या कमानीचे(प्रवेशद्वार)लोकार्पण मंगळवारी ता.23 शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.
यावेळी शाळा समिती चे अध्यक्ष सुभाष तायडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दमोता तायडे, मुख्याध्यापक विनोद कळंबे, ग्राम संसद सदस्य ऋषी शेळके, दिनेश डोईफोडे, दत्तू तायडे,रामदास शेळके, दिपक शिंदे, रोहित तायडे,कृष्णा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.मार्च 2024 मध्ये खानापुर जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे झाले होते.वार्षिक स्नेह संमेलनातून तब्बल 65 हजार इतके बक्षीस संकलित झाले होते.या रकमेतून स्नेह संमेलनाचा खर्च जाता शिल्लक राहिलेल्या रकमेतून शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान उभारण्यात आली आहे,
या कमानीचे लोकार्पण आज पार पडले. खानापुर जिल्हा परिषद शाळेत यापूर्वी लोक सहभाग व बक्षिसातून 32 ब्रास पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेले असून शाळा परिसरात आकर्षक वृक्ष वल्ली आहेत.शाळेला जालना येथील 100 शिक्षक क्लब चा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार मिळालेला असून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शाळेला तालुक्यातून द्वितीय पुरस्कार जाहीर झालेला आहे.सदर बक्षिसाची रक्कम प्राप्त झाल्यावर शाळा समितीच्या माध्यमातून आराखडा तयार करून विकासकामे करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याध्यापक विनोद कळंबे म्हणाले.यावेळी ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.