Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वायनाडमध्ये भूस्खलानामुळे 36 जणांचा मृत्यू, 70 जखमी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 30, 2024
in top news
0
वायनाडमध्ये भूस्खलानामुळे 36 जणांचा मृत्यू, 70 जखमी
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वायनाड, 30 जुलै (हिं.स.) : केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये मृतांची संख्या 36 झाली आहे. तर सुमार 70 जण जखमी झाले आहेत. वायनाडमधील मेपड्डीच्या काही डोंगराळ भागात ही भूस्खलन झाले.स्थानिक आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान मदत आणि बचाव कार्य करत आहेत. पावसामुळे कठीण आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, मेपड्डी येथे रात्री 2 वाजेच्या सुमारास दरड कोसळण्याची पहिली घटना घडली. यानंतर पहाटे 4 वाजून 10 मिनीटांनी पुन्हा भूस्खलन झाले. बचाव कार्यासाठी हवाई दलाची 2 हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एलएच सुलूरला पाठवण्यात आली आहेत. मेपड्डी येथील रुग्णालयात 16 जणांवर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) सांगितले की, बाधित भागात अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय एनडीआरएफची अतिरिक्त टीम लोकांना वाचवण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कन्नूर डिफेन्स कॉर्प्सच्या दोन तुकड्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. या पथकांना वायनाडच्या दिशेने जाण्यास आणि बचाव कार्यात मदत करण्यास सांगण्यात आले आहे. केएसडीएमएने फेसबुकवर याबाबत पोस्टही केली आहे.

वायनाडमध्ये दरड कोसळल्यानंतर आरोग्य विभागाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 8086010833 आणि 9656938689 हे दोन हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. व्यथिरी, कलपट्टा, मेपड्डी आणि मानंतवड्डी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. सर्व आरोग्य कर्मचारी रात्रीच ड्युटीसाठी पोहोचले होते. याशिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची इतर पथकेही तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, बचाव कार्यात सर्व सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांच्या मते परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्याचबरोबर सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असूनही लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती व्यक्त करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जखमींसाठी पंतप्रधानांनी देवाकडे प्रार्थना केली आहे. या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधानांनी ट्विटरवर (एक्स) पोस्ट लिहिली आहे. पंतप्रधानांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशीही बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधानांनी मंत्री जॉर्ज कुरियन यांच्याशीही चर्चा केली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने केरळच्या मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांत इशारा दिला आहे. केरळमधील कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे 50 किमी प्रति तास आहे. इतर सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Post Views: 65
Previous Post

जालन्यात भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत, चालक फरार

Next Post

प. रेल्वे विस्कळीत, झाले प्रवाशांचे हाल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
प. रेल्वे विस्कळीत, झाले प्रवाशांचे हाल

प. रेल्वे विस्कळीत, झाले प्रवाशांचे हाल

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1014194

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!