*कृषी दुतांकडून शेतातील मित्र किड्यांची माहिती*
जाफराबाद/ प्रतिनिधी
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत धनेश्र्वरी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाटोदा येथे शेतकऱ्यांना शेतात आढळणाऱ्या मित्र किड्यांची माहिती दिली त्यामध्ये किड्यांची ओळख त्यांचे नाव व इतर महत्त्वपूर्ण माहिती दिली.
कृषी दूत स्नेहल गव्हाणकर, सागर होळकर, रक्षा जयस्वाल, ऋषिकेश गायकवाड, यश फोलाने, अस्मिता जाधव, नम्रता गुंड, जयराज गायकवाड, सौरभ कदम, सार्थक कदम, राहुल घावटे यांनी परिश्रम घेतले. या दरम्यान त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष वैद्य सर, प्रशासकीय अधिकारी भालकर सर, कार्यक्रम अधिकारी सोनोने सर व विषय शिक्षिका सुरवसे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.