वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी ): बजाजनगर येथील भोंडवे पाटील शाळेत विद्यार्थी संसदेवर निवडून आलेल्या प्रतिनिधींचा सत्कार व शपथविधी सोहळा पार पडला. तीन आठवड्यांपासून ही प्रक्रिया राबवण्यात येत होती. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. त्यानंतर त्यावर फेर तपासणी करण्यात येऊन योग्य असे उमेदवार निवडण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब सुभेदार अदिनाथ शिंदे होते. यावेळी संसदेवर निवडून आलेल्या प्रतिनिधींना बॅच व सॅशे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी हनुमान भोंडवे यांनी निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींकडून शाळेचे व भारताचे भविष्य उज्वल करण्याची अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थी संसद अध्यक्ष तेजस खंडेलवाल, उपाध्यक्ष अथर्व थोरात, सांस्कृतिक विभाग प्रमुख सरन्या पुंड, सांस्कृतिक विभाग उपप्रमुख उर्वी आढाव, क्रीडा प्रमुख जीवन लांडे, क्रीडा उपप्रमुख अक्षता धोंडकर, ग्रीन हाऊस प्रमुख मनस्वी पवार, ग्रीन हाऊस उपप्रमुख आर्यन कोळी,
यलो हाऊस प्रमुख जिज्ञेश महाजन, यलो हाऊस उपप्रमुख जान्हवी पाटील, रेड हाऊस प्रमुख अनुज शिंदे, रेड हाऊस उपप्रमुख श्रावणी डुबे, ब्ल्यू हाऊस प्रमुख गौरव मठपती, ब्ल्यू हाऊस उपप्रमुख विशाखा खंडेलवाल आदी. सूत्रसंचालन स्वरा जाधव व स्नेहल मेंगडे यांनी केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक मनोज सावळे, उपमुख्याध्यापिका शर्मिष्ठा दत्ता, मिडल स्कूल प्रमुख (शैक्षणिक) राणी सावंत, गहेना शादिजा आदी उपस्थित होते.