वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी) :
श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील शिवा सिद्धेश्वर पावन महादेव शिवमंदिरात गर्दी झाली होती. शिव मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते.
बजाज नगरातील मंदिरातील शिवलिंगावर रुद्राभिषेक करून महादेवाचे पूजन करण्यात आले. शिवमंदिरात महादेवाचे दर्शन घेण्यास भक्तांनी गर्दी केली होती. श्रावण प्रारंभ आणि पहिला सोमवार म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महादेव मंदिरात शिव पाठ दररोज सायकाळी ७ ते ८ या वेळेत होणार असल्याचे मंदिराचे पुजारी महारुद्र मठपती स्वामी यांनी सांगितले. वाळूज औद्योगिक वसाहतीतील शिव मंदीरात ‘हर हर महादेव’, बम बम भोलेच्या जयघोष होत आहे.