वाळूज महानगर (प्रतिनिधी): आज नागपंचमी हा सण परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाला वारूळाची पूजा करतात , त्यासाठी औद्योगिक परिसरातील महिलांनी परिसरातील शेतांकडे धाव घेत वारुळाची पूजा केली.
नागपंचमीला नागाची आणि वारुळाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. मातीच्या दगडाच्या किंवा पिठाच्या नाग प्रतिमांची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरात भिंतीवर मातीने अगर शेणाने आदल्या दिवशी सारस्वतात नागपंचमीच्या दिवशी त्या जागेवर हळदीने कुंकवाने, किंवा चंदनाने नाग प्रतिमा रेखाटून त्याची पूजा करतात. नैवेद्य म्हणून दुध, दही, तूप, लाह्या वगैरे पदार्थ अर्पण केले जातात. औद्योगिक वसाहत ही शहरी भागात असली तरी येथील महिलांनी आपली संस्कृतीचे जतन केल्याचे दिसून येत होते.
वावरात नांग येते l
भाव लोकाचा पाह्यते ll
पीकपानी पाहोन l
समदी वाटक् लावते ll
या गीतात नागोबावरील आढळ निष्ठा व्यक्त करण्यात आली असून नागोबाची मनोभावे पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात अशी धारणा आहे त्यामुळे सकाळपासूनच नागपंचमी निमित्त महिला वर्गांनी परिसरातील वारूळांचे ठिकाण शोधून पूजन करण्यासाठी गर्दी केली होती.