Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आगामी 2047 पर्यंत विकसित भारत बनवूच- पंतप्रधान

स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्याहून संकल्पाचा पुनरूच्चार

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 15, 2024
in top news
0
आगामी 2047 पर्यंत विकसित भारत बनवूच- पंतप्रधान
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट (हिं.स.) : आगामी 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. तोपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प आम्ही घेतला असून कुठल्याही परिस्थितीत तो पूर्णत्वास नेऊ असा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुरुवारी देशाला संबोधित करताना केला. भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट येथे जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, देशासाठी बलिदान देणाऱ्या अगणित स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस आहे. हा देश त्यांचा ऋणी आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या चिंतेत भर पडली आहे. नैसर्गिक आपत्तीत अनेकांनी आपले कुटुंबीय गमावले; राष्ट्राचेही नुकसान झाले आहे. त्या सर्वांप्रती सहानुभूती व्यक्त करतो आणि खात्री देतो की, या संकटाच्या वेळी हे राष्ट्र त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. वर्तमानात आपली लोकसंख्या 140 कोटी असून जर आपण संकल्प केला आणि एकत्रितपणे वाटचाल केली तर, सर्व अडथळे पार करत 2047 पर्यंत नक्कीच विकसित भारत बनवू शकतो, असा पुनरुच्चार पंतप्रधान मोदी यांनी संबोधनाच्या सुरुवातीला केला. एक काळ असा होता जेव्हा लोक देशासाठी बलिदान द्यायला तयार होते. परंतु, आजचा काळ देशासाठी जगण्याचा आहे. देशासाठी बलिदान देण्याची तयारी देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते, तर देशासाठी जगण्याचा संकल्प भारताला समृद्ध करू शकतो. नेशन फर्स्टच्या संकल्पाने आम्ही प्रेरित आहोत. ‘व्होकल फॉर लोकल’चा मंत्र आम्ही दिला. मला आनंद होत आहे की, व्होकल फॉर लोकल हा आर्थिक व्यवस्थेचा नवा मंत्र बनला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. आमच्या सुधारणांची बांधिलकी 4 दिवसांच्या टाळ्यांसाठी नाही, आमच्या सुधारणांची प्रक्रिया कोणत्याही जबरदस्तीमुळे घडून आलेली नाही, तर ती देशाला मजबूत करण्याची आहे. आम्ही राजकीय दबावामुळे कोणताही निर्णय घेत नाही, आम्ही राजकीय गणितांनुसार निर्णय घेत नाही. आमचा एकच संकल्प आहे की, प्रथम राष्ट्रहित, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

भारतात यापूर्वी सरकार म्हणजे मायबाप अशी संकल्पना होती, नागरिकांना कोणत्याही गोष्टीसाठी त्यांच्याकडे हात पसरावे लागायचे. एखाद्या गोष्टीसाठी विनंती किंवा शिफारस करावी लागत असे. मात्र, आमच्या सरकारने प्रशासनाचे हे मॉडेल बदलले. आज प्रशासन वीज, पाणी, गॅस आणि इतर सुविधा स्वत: नागरिकांपर्यंत पोहोचवत आहे, नागरिकांना सरकारकडे यावे लागत नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या काळातील सरकारी योजनांचा आणि सुधारणांची माहिती दिली. पूर्वीच्या काळातील काँग्रेसशासित राजवटीच्या काळातील त्रुटींचा उल्लेख त्यांनी केला. अनेक दशके भारत देश ‘होता है, चलता है’, अशा वृत्तीने चालत होता. नवीन काही करायला गेले तर वाद होतील, अशी भीती अनेकांना वाटत होती. जितक्या गोष्टी आहेत, त्यामध्ये संतुष्ट राहा, अशी वृत्ती समाजात होती. देशात काही होणार नाही, परिस्थिती कधीच बदलणार नाही, अशी लोकांची मानसिकता होती. आमच्या सरकारने ही मानसिकता तोडण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले. यापूर्वी पुढच्या पिढीसाठी आम्ही आतापासून काम का करायचे, अशा वृत्तीने राज्यकर्ते वागत होते. त्यावेळी तरुणांच्या अपेक्षांचा विचार झाला नाही. त्यामुळे तरुण हे संधी आणि सुधारणांच्या प्रतीक्षेत होते. आमच्या हातात सरकारची जबाबदारी आल्यावर आम्ही मोठ्या सुधारणा केल्या. शहरी, मध्यमवर्ग, वंचित आणि तरुणांसाठी आमच्या सरकारने अनेक सुधारण केल्या. आम्ही या सुधारणा केवळ वाहवा मिळवण्यासाठी किंवा राजकीय नाईलाजापोटी करत नाही तर आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी निक्षून सांगितले. आमच्या सुधारणांचा मार्ग हा विकासाचा राजमार्ग आहे. या सुधारणा फक्त उच्चशिक्षीत किंवा बुद्धिवादी वर्गासाठी सीमित नाहीत. आम्ही राजकीय समीकरणांचा विचार करुन कोणत्याही सुधारणा राबवत नाही अथवा धोरणे ठरवत नाही. आमच्यासाठी राष्ट्र प्रथम, नेशन फर्स्ट हीच प्राथमिकता आहे. आमचा भारत महान व्हावा, हाच संकल्प मनात ठेवून आम्ही प्रत्येक पाऊल उचलतो, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी बांगलादेशात सुरू असलेला हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांसंदर्भातही भाष्य केले. बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित व्हायला हवी. भारताला शेजारील देशांमध्ये शांतता हवी आहे. बांगलादेशमध्ये जे घडले ते अतिशय चिंताजनक असल्याचे मोदी म्हणाले. बांगलादेशातील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होईल अशी आशा आहे. अंतरिम सरकार तेथील हिंदू आणि अल्पसंख्यक समाजाची सुरक्षितता सुनिश्चित करेल. तसेच, आगामी काळातही बांगलादेशच्या विकासाच्या प्रवासासाठी आमच्या शुभेच्छा कायम राहतील असे मोदी यांनी अधोरेखित केले.

Post Views: 44
Previous Post

विनेश फोगाटची याचिका क्रीडा लवादाने फेटाळली

Next Post

बांगलादेशात हिंदूंना विनाकारण लक्ष्य बनवले – सरसंघचालक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बांगलादेशात हिंदूंना विनाकारण लक्ष्य बनवले – सरसंघचालक

बांगलादेशात हिंदूंना विनाकारण लक्ष्य बनवले - सरसंघचालक

ताज्या बातम्या

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात काही महिलांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले

July 30, 2026

आसामच्या पुरात जीवावर खेळ बाबाने वाचविले तीन बाळांचे प्राण

July 30, 2026

बोलले असे की झाला नेटकर्यांचा हल्लाच

July 30, 2026

विरोधकांना चक्क शब्दाने झोडपले

July 30, 2026

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013197

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!