उमरी ( प्रतिनिधी ) बांग्लादेशात सत्तेवरून पायउतार झाल्याने तिथील अल्पसंख्याक हिंदूवर क्रुर पद्धतीने अन्याय अत्याचार तेथिल धर्मांध लोकांनी करीत दंगली घडवून आले अनेक हिंदू मंदिरे उद्धस्त करीत महिलावर आत्याचार केल्याने त्या घटनेचा निषध म्हणून उमरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे
नांदेड जिल्हातील हिंदू संघटना ही बांग्लादेशातील हिंदू वर क्रुर अन्याय झाल्याने त्या घटनेचा निषेध करण्यासाठी दि १६ ऑगस्ट रोजी जिल्हा बंद ची हाक दिली होती त्यानुसार संबध हिंदू संघटना एकवटली आणि बंदचे ऐलान करून घटनेचा निषेध अव्हान केले होते त्या अनुषंगाने उमरी शहरातही १७ ऑगस्ट रोजी सकाळ पासुनच कोणीच दुकाने , हॉटेल , पानपट्टी , बाजारपेठ , व्यापार पेठ, बियर अन्ड बॉर , खानावळ , शाळा महाविद्यालये उघडलेच नाहीच उमरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे
विशेषता उमरी शहरात हिंदू – मुस्लीम ऐक्य असल्याने मुस्लीम समाज बांधव सर्व दुकाने बंद करून निषेधात सहभाग नोंदवला आहे .
एक दिवस अगोदरच जिल्हा बंद च्या अव्हाला उमरीकर होकार देत बंद पाळून निषेध केला आहे . शहरात कांही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे म्हणून पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी पोलिस फोर्सचा घेवून चोक बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही .