उमरी – पथविक्री उपजीविकास संरक्षण व पथविक्री विनीयमअधिनियम २०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण पथ
विक्री विनियम ) नियम २०१६ नियम १४ ( २) अन्वये पथविक्रेता
सदस्यांच्या निवडणुका कार्यक्रम २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम नुसार आज दिनांक १६ ऑगस्ट २०२४ रोजी नगरपरिषद उमरी जिल्हा नांदेड निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलम कांबळे यांच्या कक्षात एकूण सहा(०६)अर्ज प्राप्त झाले.
या कामी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मदने , वरिष्ठ लिपिक सचिन गंगासागरे, संतोष मुंडे, नरेंद्र खंदारे, गायकवाड पी. एम., गंगाधर पवार यांचे सहकार्य लाभले