Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

काँग्रेसचा बैलपोळा…. नवचैतन्याचा सोहळा…

सर्वधर्मसमभावाचा संदेश ; तेरा वर्षाची परंपरा कायम*

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 4, 2024
in solapur
0
काँग्रेसचा बैलपोळा…. नवचैतन्याचा सोहळा…
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा वृत्तसेवा मुदखेड :

मुदखेड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने गेल्या तेरा वर्षापासून सुदृढ बैल जोडी व शेतकऱ्यांचा गौरव सोहळा साजरा करण्याची परंपरा अजूनही कायम असून सर्वधर्म समभावाचा संदेश देत नवचैतन्याचा सोहळा ठरला आहे.

भारतीय संस्कृतीत शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण सर्वात महत्त्वाचा समजला जातो. कबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच मानेवर जीवाचे ओझे वाहत कुटुंबाच्या उदरनिर्वाहात मोलाचा वाटा असनाऱ्या बैल राजा तसेच बळीराजाचा गौरव सोहळा झाला पाहिजे ही संकल्पना युवक काँग्रेसने अमलात आणली. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळातील खंडानंतर पुन्हा बैलपोळा व गौरव सोहळा जोमात व उत्साहात सुरू करण्याचा निर्णय युवक काँग्रेसचे गिरीश कोतावार, गजानन संबोड, राधेश्याम ढगे, एडवोकेट माणिक पचंलिंग, , यांच्या पुढाकारातून यावर्षी सुरू करण्यात आला.हनुमान मंदिरात सोहळा आयोजित करण्यात येऊन सर्व बैल जोड्यांचे सामूहिकरीत्या उभे करून त्यातील सुदृढ बैल जोडी निवडीसाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीत वैजनाथ भालेराव, सदाशिव मोरे, गंगाधर राजेवाड, रामचंद्र शेटे, देविदास चंद्रे यांचा समावेश होता.

बैलपोळा निमित्त काँग्रेसच्या वतीने पाच आकर्षक बक्षिसांसह प्रोत्सांहपर बक्षीस ठेवण्यात आले होते. यामध्ये प्रथम पारितोषिक सात हजार एकशे आकरा, द्वितीय पारितोषिक पाच हजार एकशे आकरा रुपये, तृतीय पारितोषिक 3111रुपये, चतुर्थ पारितोषिक 2111 रुपये, पाचवे पारितोषिक पंधराशे आकरा व प्रोत्साहन पर अकराशे आकरा रुपये ठेवण्यात आले होते. पारितोषिक निवडीच्या निकषात सुदृढ बैल, रंगरंगोटी सजावट यास प्राधान्य देण्यात आले होते. यामध्ये शहरातील जवळपास 200 च्या वर बैलजोडींनी सहभाग घेतला होता.

सुदृढ बैलजोडी च्या प्रथम पारितोषिकेचा मान गजानन चौधरी यांच्या बैलजोडीस मिळाला आहे. द्वितीय पारितोषिक वैजनाथ पचलिंग, तृतीय पारितोषिक बाळू चंद्रे, चतुर्थ पारितोषिक भुजंग फुले, पाचवे पारितोषिक माधव आऊलवार यांच्या बैलजोडीस मिळाले आहे. प्रोत्साहन पर पारितोषिक भाजपचे समन्वयक संजय आऊलवार यांच्या बैलजोडीस मिळाले. काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख बारडकर, शहराध्यक्ष कैलास गोडसे, युवा काँग्रेसचे गजानन संबोड, गिरीश कोतावार, राधेश्याम ढगे, महाराजा डेअरी, शिवानंद देवके यांच्या वतीने बक्षीस ठेवण्यात आली होती.

सुदृढ बैलजोडींना काँग्रेसचे केशवराव कदम, करीम खान साहब, शंकर राठी, खलील कुरेशी, महावीर कंधारकर,सुधाकर आडकीने, प्रताप देशमुख कैलास गोडसे, अतिक अहमद, शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्रे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यासोबतच शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. या उपक्रमाने शेतकऱ्यात नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. काँग्रेसच्या वतीने सर्वधर्मसमभावाचा संदेशही देण्यात आला.या उपक्रमासाठी गिरीश कोत्तावार, राधेश्याम ढगे, गजानन संबोड

,सुरेश ढगे,माणीक पचंलीग, शिवानंद देवके, शिवा तरोडकर, मोईन खान, महेश गोदनगावे ,वेदांत शेवटे यांच्यासह आदींनी पुढाकार घेतला होता. यावेळी , रमेश बोडके, संदेश वाघमारे, राजण वडे, शिरीष श्रीरामवार, लतीफ टेलर, माध्यम समूहाचे अध्यक्ष सिद्धार्थ चौदांते, अब्दुल रझाक, ईश्वर पिनलवार, शेख जब्बार,यांच्यासहशेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 41
Previous Post

भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी

Next Post

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

अर्धापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; मुख्यमंत्र्याकडे मागणी..!!!!

ताज्या बातम्या

सरळसेवा परीक्षा पारदर्शक पद्धतीने; गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क

July 28, 2026

भविष्य निर्वाह निधीचे (जीपीएफ) वार्षिक विवरणपत्र सेवार्थवर उपलब्ध

July 28, 2026

अभय योजनेत गाळे सीलचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने १४ कर्मचाऱ्यांवर दंड

July 28, 2026
महिलांसाठी कल्याण योजनांची सुवर्णसंधी; पंचायत समितीतच ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महिलांसाठी कल्याण योजनांची सुवर्णसंधी; पंचायत समितीतच ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

July 28, 2026

बैल सजविण्याच साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

July 28, 2026
रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

July 28, 2026
मुंबईच्या स्वामी भक्त ज्योती साळूंखे यांच्या वतीने वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

मुंबईच्या स्वामी भक्त ज्योती साळूंखे यांच्या वतीने वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप

July 28, 2026
महिलेस मारहाण करून सोन्याची माळ पळवली

महिलेस मारहाण करून सोन्याची माळ पळवली

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007771

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!