Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘मालेगाव स्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्याचे काँग्रेसने रचलेले कुंभाड ! – समीर कुलकर्णी

तरुण भारतbyतरुण भारत
October 17, 2025
in maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


कोल्हापूर – मालेगाव बॉम्बस्फोट’ हे ‘भगवा आतंकवाद’ अस्तित्वात असल्याचे सिद्ध करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने रचलेले एक मोठे कुभांड होते. देशातील अन्वेषण यंत्रणा स्वतंत्रपणे काम न करता, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचत होत्या. त्यामुळे मालेगाव आणि त्यानंतर झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांचा तपास करण्याऐवजी तत्कालीन काँग्रेसी राज्यकर्त्यांनी त्यात नाहक हिंदुत्वनिष्ठांना गुंतवले, असा स्पष्ट प्रतिपादन मालेगाव स्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेले श्री. समीर कुलकर्णी यांनी केले.

     हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथील ‘देवल क्लब’मध्ये आयोजित ‘मालेगाव स्फोटात निर्दोष ठरलेल्या धर्मयोद्ध्यांच्या आणि त्यांच्या अधिवक्त्यांच्या सत्कार’ समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी ८०० हून अधिक हिंदू उपस्थित होते. कार्यक्रमात धर्मवीर समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता प्रीती पाटील आणि हिंदुत्वनिष्ठ लेखक श्री. विक्रम भावे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सत्कारमूर्तींची वाहनातून सभास्थळापर्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली.

मोठ्या लोकांची नावे घेतली नाही म्हणून आमची अटक ! – मेजर रमेश उपाध्याय
मालेगाव स्फोट झाला त्या दिवशी मी मुंबईत होतो, तरीही मला अटक करून मारहाण करण्यात आली. प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, श्री. प्रवीण तोगाडिया, श्री श्री रविशंकर, योगी आदित्यनाथ यांची नावे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला; पण मी शेवटपर्यंत त्यांची नावे घेतली नाहीत. त्यामुळे आमची जाणीवपूर्वक गोवण्यात आले. आमचे सामाजिक आणि आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त केले. केवळ राजकीय फायद्यासाठी आमच्यावर अन्याय झाला, असा धक्कादायक गौप्यस्फोट मालेगाव बॉंबस्फोटातून निर्दोष मुक्त झालेले तथा भारतीय सैन्य दलातील मेजर रमेश उपाध्याय यांनी कोल्हापुरात केला.

अन्याय झाला तरी हिंदुत्वाचे कार्य सोडणार नाही ! – विक्रम भावे, लेखक
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात कोणताही संबंध नसतांना मला आणि अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करण्यात आली. हत्येनंतर १५ मिनिटांतच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही हत्या ‘गोडसेवादी’ लोकांनी केल्याचे जाहीर केले होते. यावरून पुरोगाम्यांचे आरोप किती बेगडी व नियोजित असतात, हे स्पष्ट होते. दडपशाही करून तुम्ही आम्हाला छळू शकाल; पण आम्ही हिंदुत्वाचे कार्य सोडणार नाही, असे ठाम प्रतिपादन ‘मालेगाव स्फोटामागील अदृष्ट हात’ व ‘दाभोलकर हत्या व मी’ या पुस्तकांचे लेखक श्री. विक्रम भावे यांनी केले.

काँग्रेसी, साम्यवादी व जिहादी यांद्वारेच ‘भगवा आतंकवाद’चा अपप्रचार ! – श्री. सुनील घनवट
काँग्रेससारख्या निधर्मी शासनकर्त्यांनी साम्यवादी आणि जिहादी शक्तींसोबत मिळून देशात ‘भगवा आतंकवाद’ असल्याचा पद्धतशीर अपप्रचार केला. यासाठी मालेगाव २००८, समझौता बॉम्बस्फोट, मडगाव स्फोट २००९, दाभोलकर-पानसरे हत्या अशा अनेक प्रकरणांमध्ये निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवण्यात आले. या षड्यंत्राला बळी पडलेल्यांच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

साम्यवाद्यांनी केलेल्या १४ हजार हत्यांविषयी कुणी का बोलत नाही ! – अधि. वीरेंद्र इचलकरंजीकर
     या प्रसंगी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर म्हणाले, ‘‘दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर गळा काढला जातो; मात्र साम्यवाद्यांनी देशात १४ हजार अधिक हत्या केल्या, याविषयी कुणी का बोलत नाही ? यापुढील काळात नाहक गोवलेल्या आणखीन काही हिंदुत्वनिष्ठांचाही सत्कार याच ठिकाणी आणि याच व्यासपिठावर होईल. आपल्याला समाजात हिंदूंच्या विरोधात चालू असलेली इकोसिस्टीमच्या विरोधात लढा द्यावा लागेल.’’

     या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु एकताचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहरप्रमुख श्री. गजानन तोडकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, उद्धव बाळासाहेब पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, उद्योजिका सौ. मनिषा वाडीकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. विपुल भोपळे आणि श्री. अमोल कुलकर्णी यांनी केले.

Post Views: 21
Previous Post

तेलगाव येथील मुलांना शालेय साहीत्य मदत करण्याचे आवाहन

Next Post

युवा महोत्सवामध्ये सांगोला महाविद्यालयास १५ पारितोषिकासह नृत्य विभागाची चॅम्पियनशिप, श्रुती घाडगेला स्त्री अभिनय पुरस्कार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

युवा महोत्सवामध्ये सांगोला महाविद्यालयास १५ पारितोषिकासह नृत्य विभागाची चॅम्पियनशिप, श्रुती घाडगेला स्त्री अभिनय पुरस्कार

ताज्या बातम्या

ढासला येथे घरकुल घोटाळा ?सुमारे चार कोटींच्या गैरव्यवहाराचा गंभीर आरोप.#vairal

February 17, 2026

पिंपळगाव येथे सरस्वती विद्यालयाचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या थाटात संपन्न.#viral

February 17, 2026

स्वीकृत नगरसेवक पदी शरद मोरे, सतीश बोराडे यांची बिनविरोध निवड.#public #viral #marathinews

February 17, 2026

बसस्थानकाच्या स्लॅबवर मंजूर ऐवजी अन्य कंपनीचे सिमेंट ? निविदा अटींचा भंग झाल्याचा संशय.#public

February 17, 2026

वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.#public #marathinews #viral

February 17, 2026

पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पारधयेथे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..#public #marathinews

February 17, 2026

धनराज मोकासे रायझिंग स्टार अवॉर्ड्स ने सन्मानित.#public #marathinews #solapurnews #viral

February 17, 2026

सोलापूर जिल्हा बसव ब्रिगेडकडून गरजूंना दिलासा ना नफा ना तोटा तत्वावर रुग्णवाहिकेचे लोकार्पण.#public

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0684921

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697