सोलापूर – कार्तिकी एकादशी निमित्त प्रवासी भाविकांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे आदिलाबाद आणि पंढरपूर दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.
ट्रेन क्रमांक ०७६१३/०७६१४ आदिलाबाद-पंढरपूर विशेष ४ फेऱ्या असतील. ट्रेन क्रमांक ०७६१३ विशेष ३१ ऑक्टोंबर आणि ४ नोव्हेंबर रोजी आदिलाबादहून सकाळी ८:३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २ वाजता पंढरपूरला पोहोचेल. या गाडीच्या २ फेऱ्या होतील. तर ट्रेन क्रमांक ०७६१४ स्पेशल पंढरपूर येथून १ आणि ५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता निघेल आणि आदिलाबादला दुसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या ही फेऱ्या होतील.
किनवट, बोधड़ी बुजुर्ग, धानोरा डेक्कन, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, औसा रोड, ढोकी, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डूवाडी, मोडलिंब असे थांबे असतील तर 1AC-III टियर, 4 स्लीपर क्लास, 13 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. २० कोच अशी असणार आहे.
















