Friday, April 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुकानात कोयत्याने मोडतोड, जीवे मारण्याची धमकी… पोलीसांनी आरोपीची काढली धिंड

तरुण भारतbyतरुण भारत
November 1, 2025
in crime
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वैराग – जुन्या गुन्ह्यामध्ये माझे नाव का घेतले म्हणून भर दिवसा वैराग मधील एका दुकानात जाऊन कोयत्यांनी दहशत माजवत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात कोयता वापरून दहशत माजवल्याने  भविष्यातील धोके ओळखून वैराग पोलिसांनी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढून सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वैराग शहरातील पंचशील नगर येथे फिर्यादी सुरज भोसले यांचे भोसले ट्रेडर्स किराणा मालाचे दुकान आहे.या दुकानांमध्ये एक वर्षांपूर्वी तुळशीदास नगर येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्यावरून तेथील विद्यमान सरपंचांचे दीर अजित पाटील यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी आयाज शेख, युवराज प्रबळकर,विजय उबाळे व प्रतीक भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी माझे नाव का घेतले? असे म्हणत ,आयाज शेख याने कोयता घेऊन भोसले ट्रेडर्स मध्ये गुरूवारी सायंकाळी ६ वाजता दुकानात जात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्याने काउंटरवर असलेले कॅडबरी फ्रिज फोडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आणि काही वेळातच तो पळून गेला. दरम्यान कोयत्याने दहशत माजवल्यामुळे वैराग शहरात एकच खळबळ उडाली.त्यानंतर वैराग पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे आणि श्रीमंत शिंगाडे या दोघांनी वेगाने सूत्रे हलवून अवघ्या एका तासात आत आरोपीला त्याच्या हत्यारासह ताब्यात घेतले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. शुक्रवारी सकाळी आरोपीची मुख्य रस्त्यावरून धिंड काढत भोसले ट्रेडर्स मध्ये नेऊन पंचनामा करण्यात आला.

दरम्यान वैराग मध्ये वाढत्या दहशती कृत्यांविरोधात पोलीस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.ही धिंड पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव,पोलीस हेडकॉन्स्टेबल फुलचंद जाधवर, उमेश कंगले,आकाश पवार, सागर उमाटे,शिवलिंग कांबळे, राहुल पाटील यांनी काढली.

दुकानात गिऱ्हाईक चालू असताना ग्राहकाला देखील शिव्या दिल्या, ३०७ च्या जुन्या गुन्ह्यात नाव का घेतले म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी देत कोयत्याने कॅडबरीचा फ्रिज फोडत दहशत माजवली असे सुरज भोसले यांनी सांगितले. 

यापूर्वी संबंधित आरोपीवर ३०७ चा गंभीर गुन्हा दाखल असून वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाप्रकारे दहशत माजवण्याचा कुणीही प्रयत्न केला तर तो खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिला आहे.

Post Views: 40
Previous Post

चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

कॉरिडॉर सक्तीची धमकी चुकीची : तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कॉरिडॉर सक्तीची धमकी चुकीची : तीर्थक्षेत्र बचाव समितीचे अध्यक्ष अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर

ताज्या बातम्या

निक्षय आठवडा स्पर्धेत सोलापूर महानगरपालिका प्रथम

April 10, 2026

एचआयव्ही संसर्गाचा चुकीचा रिपोर्ट आला आणि क्षणात संसार मोडला

April 10, 2026

नाशिक मध्ये ओळख लपवून दोन हिंदू मुलींना फसवले

April 10, 2026

स्वेरी कॉलेजवर पेटले विद्यार्थ्यांचे आंदोलन

April 10, 2026

भरदिवसा पेट्रोल पंपावर नवऱ्याने केला बायकोचा खून

April 10, 2026
मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

मावडीकरांची ४० वर्षापासून सनई नगारा वादन सेवा

April 10, 2026
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळातर्फे खा. डॉ. ज्योती वाघमारे यांचा सत्कार

April 10, 2026
श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

श्रीशैल कावडीचे सोलापुरात आगमन

April 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0798571

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697