सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षकांना टीईटी परीक्षा देणे बंधनकार आहे. येत्या २३ नोव्हेंबरला शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) तर ८ फेब्रुवारीला टीएआयटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रामधून २१५२१ परीक्षार्थी टीईटी परीक्षा देणार आहेत.
परीक्षेविषयीची तयारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. अनेक उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट होतात. पेपर क्र. एक व दोन एकाच दिवशी घेतले जाणार आहेत.
यंदा परीक्षार्थीची संख्या वाढली आहे, परीक्षेला डी.एड., बी.एड. धारकांसह कार्यरत शिक्षकही असून नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे संख्या वाढल्याची चर्चा आहे. टीईटी परीक्षेसंदर्भात मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
……
एकूण उमेदवार.. २१५२१
पेपर २ चे उमेदवार .. १२०८१
पेपर १ चे उमेदवार.. ९४४०
एकूण परीक्षा केंद्र.. ३४

















