सोलापूर – प्रवाशांच्या मागणीनुसार, रेल्वे एसएमव्हीटी बेंगळुरू आणि बीदर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवा खाली दिलेल्या तपशीलांनुसार अतिरिक्त ३४ फेऱ्यांसाठी सुरू ठेवणार आहे. यामध्ये एसएमव्हीटी बेंगळुरू – बीदर द्वि-साप्ताहिक विशेष १८ फेऱ्या होतील. ट्रेन क्रमांक ०६५३९ एसएमव्हीटी बेंगळुरू-बीदर द्वि-साप्ताहिक विशेष ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत चालवण्याची अधिसूचना देण्यात आली होती.
दर शुक्रवार आणि रविवारी २८ डिसेंबर २०२५ पर्यंत चालवली जाईल. या गाडीच्या १७ फेऱ्या असतील, ट्रेन क्रमांक ०६५४० बीदर -एसएमव्हीटी बेंगळुरू द्वि-साप्ताहिक विशेष १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत चालवण्याची सूचना देण्यात आली होती.ती आता २९ डिसेंबर २०२५ पर्यंत दर शनिवार आणि सोमवार चालवली जाईल या गाडीच्या १७ फेऱ्या होतील. या गाड्यांच्या रचनेत आणि थांब्यात कोणताही बदल होणार नाही.
या विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील ३ स्थानकांवर थांबतील, म्हणजेच: कलबुरगि, शहाबाद आणि वाडी.
























