वेळापूर – वसुंधरा कला महाविद्यालय जुळे, सोलापूर येथे झालेल्या १९ वर्ष वयोगट मुली शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत वेळापूर तालुका माळशिरस येथील इंग्लिश स्कूल वेळापूर संघाने अंतीम सामन्यात सांगोला (शिवणे ) संघाचा १ डाव १२ गुणांनी पराभव करीत यश मिळवले. तसेच १९ वर्ष मुले खो खो संघ इंग्लिश स्कूल वेळापूर च्या मंद्रूप संघाचा एक डाव सात गुणांनी पराभव केला सदर प्रशालेच्या दोन्ही संघाची इंदापूर ( पळसदेव ) येथे दि ७/११/२५ दरम्यान होणाऱ्या पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दोन्ही संघाच्या यशस्वी खेळाडूंना क्रिडाशिक्षक सतीश कदम, शिवाजी जाधव, सोमनाथ बनसोडे, अर्धनारी नटेश्वर क्रिडामंडळाचे अध्यक्ष जावेद मुलाणी, वेळापूर सरपंच रजनिश बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम , संस्थेच्या संचालिका डॉ. सौ मीनाक्षी कदम, सचिवा डॉ. सौ. प्रियदर्शनी महाडिक, संचालिका सौ. तेजस्विनी कदम, शाळा समिती चेअरमन प्रतापराव पाटील, प्राचार्य आर बी पवार , उपमुख्याध्यापक पठान शिवशरण , पर्यवेक्षक सावळे बी एस, जावेद आतार, अॅड. मंडले,ग्रामपंचात सदस्य संजय मंडले, भय्या चंदनशिव, भय्या कोडग, दावल शेख,आशोक जाधव, रामजी कश्यप, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अमोल मंडलिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप जगदाळे, उपाध्यक्ष प्रियंका पोरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, माजी खेळाडू, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.


















