Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादीला ठोकला राम-राम ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ घेतले हाती 

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2025
in political
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. सोलापुरातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश मुंबई येथे सोलापूर महापालिकेच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत झाला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुधीर खरटमल यांच्या गळ्यात राष्ट्रवादीचा शेला घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, पक्षाचे सोलापूर संपर्क मंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, शहराध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, किसन जाधव, तसेच राज्य पातळीवरील नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सुधीर खरटमल यांच्या पक्ष प्रवेशामुळे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुधीर खरटमल यांचे कार्यकर्ते देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच सोलापूर दौऱ्यावर येणार असून त्यावेळी असंख्य कार्यकर्ते तसेच माजी महापौर दिग्गज नेते देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे सुधीर खरटमल यांनी सांगितले.

     दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष विरुद्ध पदाधिकारी असा वाद सुरू झाला होता. सुधीर खरटमल यांच्या विरोधाचे लोण थेट गोविंद बागेच्या अंगणात जाऊन थडकले होते. गत सोमवारी शरद पवार यांच्या बारामती येथील “गोविंदबाग ” या निवासस्थानी जाऊन शहराच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट आपले गाऱ्हाणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर मांडले. त्यामध्ये मुंबई येथे शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी बैठकीस स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवल्याचा विषय चिघळला. याच मुद्द्यावरून शरद पवार यांनी शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची चांगलीच कान उघडणी केल्याची माहिती समोर आली होती. काही निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा विषय गाजला होता. यावेळी मात्र शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शरद पवार यांच्यासमोर घडलेल्या घटनेनंतर आपल्या चुकीची कबुली दिली होती. मात्र पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकारणाला वैतागून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले .

     दरम्यान, याच घटनेवरून आता काही पदधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद उफाळून येत असताना शहराध्यक्षांच्या बाजूने राजीनामा नाट्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पक्षांतर्गत घडलेल्या या घटनेनंतर नाराज असलेले सुधीर खरटमल यांनी टोकाचा निर्णय घेत, आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कुरघोड्या सुरु असल्याचे दिसून येत आहे. तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक बोलावली होती. याबैठकीस सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधीर खराटमल यांनी स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवले. दस्तुरखुद शरद पवार यांच्या बैठकीला अध्यक्षांनी दांडी मारल्याने तसेच पूर्वाश्रमीच्या भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्या महेश गाडेकर यांना आपला जवळचा कार्यकर्ता म्हणून बैठकीला पाठवल्याने राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राग अनावर आला. यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील राजकारण चांगलेच तापले. यावरून शहर राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष विरुद्ध कार्यकर्ता असा कलगीतुरा पहावयास मिळाला होता. 

 

अजित पवार यांच्या सोलापूर दौऱ्यात अनेक दिग्गज नेते करणार पक्षप्रवेश 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे. यातूनच अनेक दिग्गज नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. या महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यावेळी शरद पवार यांच्या पक्षातील अनेक दिग्गज नेते माजी महापौर व  नगरसेवक अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुधीर खरटमल यांनी शहरातील विविध संघटनात्मक कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावली.

सुधीर खरटमल हे शरद पवार गटाचे सोलापूर शहराध्यक्ष म्हणून सक्रियपणे काम पाहत होते. त्यांनी गेल्या काही महिन्यांत शहरातील विविध संघटनात्मक कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती. मात्र, गटांतील अंतर्गत मतभेद आणि आगामी निवडणुकांतील संधी लक्षात घेऊन त्यांनी अजित पवार गटात प्रवेश दिला आहे. त्याचा फायदा पक्षाला होईल.

– संतोष पवार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 

(अजित पवार गट )

सुधीर खरटमल यांच्या प्रवेशानंतर अजित पवार गटात उत्साहाचे वातावरण आहे. “खरटमल यांच्यासारखा मजबूत संघटनात्मक कार्यकर्ता आमच्या गटात आल्यानं सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गट आणखी बळकट होणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेगळे वळण लावणारा मोठा टप्पा मानला जात आहे. सुधीर खरटमल यांच्या प्रवेशामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद निश्चितच वाढणार आहे.

फोटो ओळ – सुधीर खरटमल यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Post Views: 32
Previous Post

वळसंग मध्ये स्वामी भक्तांना प्रसाद वाटप

Next Post

२५४ पूरग्रस्त लोकांना पतसंस्थे तर्फे अन्नधान्य किट वाटप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

२५४ पूरग्रस्त लोकांना पतसंस्थे तर्फे अन्नधान्य किट वाटप

ताज्या बातम्या

आता सोलापूर मध्ये डॉ. चिन्मय परळे यांची रुग्णसेवा सुरू

April 16, 2026

डॉ. तनुश्री परळे यांचे सोलापुरातील रुग्णसेवेत पदार्पण

April 16, 2026

उदगीर मध्ये डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

April 16, 2026

अंतर्मनातील बालस्व ओळखा आत्मशुद्धीतूनच खरे सुख

April 16, 2026

मुख्याध्यापक सुनील वानखेडे यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात साजरा

April 16, 2026

पार्क चौकात सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला

April 16, 2026

रेणुका महागावकर लिखित हृदयस्थ पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

April 16, 2026

भोकरदन येथे स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

April 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0813249

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697