मुदखेड / नांदेड – मुदखेड भाजपाचे शक्ती प्रमुख गोविंद गोपनपल्ले यांना पक्षात दर्जाहिन वागणूक मिळत असल्यामुळे भाजपाला राम राम केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे ओबीसी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करत आहेत माझ्या घरी ओबीसीची बैठक झाली त्यावेळी मला अशोक चव्हाण यांचा फोन आला होता तेव्हापासून ते माझ्या बाबतीत गैरसमज करून घेतला आहे. मी ओबीसीचा कार्यकर्ता असून ओबीसी साठीच काम करेल माझ्यावर येणाऱ्या दबावाला मी घाबरत नसून ओबीसीचेच कार्य करण्याकरिता मी भारतीय जनता पक्षाचा व पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती गोविंद गोपनपल्ले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सांगितले की भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीच्या मूल्यांवर आधारित असून परंतु नांदेड जिल्ह्याचे आयात नेते भाजपा मध्ये प्रवेश करून पक्षातील लोकशाही पूर्णता पायमल्ली करून हुकूमशाहीच्याच मार्गावर स्वतःच्याच विचारसरणीतून निर्णय घेत जुने निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता काँग्रेस पक्षातून आलेले कार्यकर्त्यांची चमकोगिरी पुढेकर दिसत असून पक्षातील जुन्या जाणत्या निष्ठावांत कार्यकर्त्यांना येत्या काळात न्याय मिळेल अशी आशा करणे चुकीचे ठरेल असे ठाम मत यावेळी मांडले.
मुदखेड नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळणी चालू असतानाच भाजपाच्या कार्यकर्त्याच्या राजीनामा म्हणजे भाजपलाही खिंडार पडण्याची शक्यता आहे इच्छुकांची गर्दी जास्त असल्यामुळे आणि किती जण नाराज होऊन भाजपा सोडतील याची कल्पना करता येत नाही. येणाऱ्या निवडणुकीत गोविंद गोपनपल्ले यांनी त्यांच्या वार्डातील लोकांना विश्वासात घेऊनच हे निवडणूक लढवणार असल्याचे गोपनपल्ले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
























