मोडनिंब – पत्रकारांची ताकद मोठी असून त्यांनी दिलेल्या बातम्याची दखल सरकार घेतेच. त्यातून सकारात्मक बदल निश्चितपणे होतात. भविष्यातही समाजोपयोगी पत्रकारिता करावी, असे मत भाजप नेते तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.मोडनिंब (ता.माढा) येथे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पत्रकारितेच्या सामर्थ्यावर त्यांनी प्रकाश टाकला. पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन उपस्थित पत्रकार बांधवांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर ४०० x १०० रिले स्पर्धेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक तसेच ४०० x ४०० रिले स्पर्धेमध्ये राज्यात तृतीय क्रमांक आल्याबद्दल ऋषिकेश माणिक कणसे याचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले.भाजप नेते तथा सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, मारुती वाघ, रमेश शिरसट यांनी पत्रकारिता व माध्यमांची जबाबदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. समाजातील प्रश्नांना अग्रक्रम देत जबाबदार आणि निर्भीड पत्रकारिता करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपा मोडनिंब शहर व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी माजी सरपंच कैलास तोडकरी, खरेदी विक्री संघाचे चेअरमन बंडूनाना ढवळे, भाजप शहराध्यक राहुल गांधी, रवीकांत जाधव, नवनाथ मोहिते, ॲड. गणेश सुर्वे, सरचिटणीस धनाजी लादे, मोडनिंब पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रथमेश पवार, वसुदेव खंदारे, मारुती वाघ, विरेन कुलकर्णी,रमेश शिरसट, किशोर ओहोळ, तानाजी इंगळे, लक्ष्मण जाधव, विजयकुमार परबत, चांगदेव वरवडे, सत्यनारायण गिड्डे, संतोष पाटील, युवराज सिंग, लखन पाटील, रोहन शिंदे, अभिषेक पवार, अजय चोपडे, मनीषा गिड्डे, रोहिणी मोहिते, अश्विनी बाभळे, भक्ती पवार,आशा खजुरकर, कुसुम जाडकर, अक्षदा निचाळ आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी लादे यांनी केले. प्रास्ताविक कैलास तोडकरी व राहुल गांधी यांनी केले. तर आभार ॲड. गणेश सुर्वे यांनी मानले.




















