Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्यावतीने २६५ लाभार्थ्यांना स्वेटर वाटप आणि “ समर्थ महाप्रसाद सेवा”

तरुण भारतbyतरुण भारत
December 5, 2025
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तजयंती निमित्त गुरुवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला ४ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून २६५ लाभार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. गेली ४ वर्षे “ समर्थ महाप्रसाद सेवा” हा उपक्रम स्वामीकृपेने अविरतपणे सुरु आहे.

दरम्यान स्वामी भक्त देणगीदार यांच्या हस्ते महानैवेद्य, आरती संपन्न झाल्यानंतर महानैवेद्याचा संकल्प सोडण्यात आला. यासह न्यासाने सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला श्रीदत्त जयंतीच्या या दिवशी ४ वर्ष पूर्ण झाले असून, दररोज २६५ निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा ‘समर्थ महाप्रसाद’ डबा घरपोच दिला जातो. यंदा सदरच्या लाभार्थ्यांना थंडीचे वाढते प्रमाण पाहता सर्वाना स्वेटरचे वाटप सिने अभिनेते अक्षय मुदवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मनोजकुमार लोहिया हे उपस्थित होते.

**राज्याच्या धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य :*

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विविध क्षेत्रातील अफाट कार्य व परिसरातील विकासाने श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर पडत असून, धार्मिकते बरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीडा या क्षेत्रात राज्याच्या धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. उत्तोरोत्तर अन्नछत्र मंडळाची प्रगती होतच राहील अशा शुभेच्छा माज्याकडून देत आहे.

               

सिने अभिनेते अक्षय मुदवाडकर श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे

**समर्थ महाप्रसाद लाभार्थ्यांना स्वेटर वाटप :*

गेल्या वर्षभरापासून न्यासाकडून दररोज २६५ निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद डबा घरपोच दिला जातो. अशांनकरिता गुरुवारी श्रीदत्त जयंती निमित लाभार्थ्यांना महाप्रसादा बरोबरच स्वेटर वाटप करण्यात आले. सदर लाभार्थ्यांना शहरातील विविध ठिकाणाहून वाहनांच्या माध्यमातून अन्नछत्र मंडळात आणण्यात आले. 

अविरत सेवा :

अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोक आम्ही या अगोदर उपाशी राहून दिवस काढलो आहोत, ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सेवेकाऱ्यानी सण, वार, उत्सवाच्या काळातही “समर्थ महाप्रसाद” सेवा ही अविरत गेल्या ४ वर्षापासून सुरु आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व  न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले हेच आमचे आधारवड असून, या सेवेबरोबरच आपुलकीचे नाते, काळजी आमची घेत असल्याचे  लाभार्थी रत्नाबाई बनसोडे, शरीफ मुल्ला, पार्वती ऐवळे, ललिता होटकर यांनी याप्रसंगी सांगितले.

 

*समर्थ महाप्रसाद सेवा :*

“समर्थ महाप्रसाद” सेवेने गेल्या ४ वर्षात मोठा टप्पा पार केला असून २६५ जणांना सकाळी व संध्याकाळी पुरेल असा घरपोच डबा देण्यात येत आहे. बाहेरून आलेल्यांची अन्नछत्रच्या माध्यमातून सेवा केली जाते. परंतु श्री क्षेत्र अक्कलकोटातील निराधार, दिव्यांगांना आधार मिळावा म्हणून ही सेवा सन २०२१ च्या दत्त जयंती पासुन सुरु असल्याचे न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी सांगितले. 

यावेळी श्री शितोळे बाबा ट्रस्ट घाटकोपर (पूर्व), मुंबई येथून आलेल्या पालखीचे स्वागत अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांनी केले.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक दिपक भिताडे उत्तर पोलीस ठाणे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, रामचंद्रराव घाटगे, मनोज निकम, अप्पा हंचाटे, सनी सोनटक्के, मुख्य लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, डॉ. प्रसाद प्रधान, सौरभ मोरे, सिद्धेश्वर मोरे, रोहित खोबरे, बाबू मसुती, निखील पाटील, प्रवीण घाडगे, प्रदीप सलबत्ते, प्रवीण बाबर, विजय माने, ज्ञानेश्वर भोसले, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रसाद मोरे, सुमित घाडगे, छोटू फडतरे, आकाश गडकरी, रोहन नंदने, काशिनाथ चिंचोळकर, नाथाभाऊ भजनावळे, मयुरेश माणकेश्वर, भिमाशंकर गवळी, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी, विश्वंभर पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, गोरख माळी, रामचंद्र समाणे, योगेश कटारे,  महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी, धनंजय निंबाळकर, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, राजू पवार, गोविंदराव शिंदे, महादेव अनगले, मल्लप्पा कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, प्रतिक लांडगे, चंद्रकांत कुंभार, सागर जाधव, विपुल कदम, रोहित कदम, किरण साठे, साहिल सय्यद, समर्थ शिंदे, काशिनाथ वाले, व निर्धारित वेळेत लाभार्थ्यांना डबा पोहच करणारे सेवेकरी अतिश पवार, मारुती बोरकर, अप्पाशा मलवे, शेखर कांबळे, संतोष मोरे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Post Views: 68
Previous Post

वाखरी-वडाची वस्ती रस्ता उखडला; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी

Next Post

बार्शीच्या अमृता शहा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शीच्या अमृता शहा राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

ताज्या बातम्या

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

राऊताना माण मधून आला आहेर #viral #news #marathinews

August 4, 2026

माजी राज्यपाल व गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं निधन #marathinews

August 4, 2026

नगर अभियंता अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा #solapurnews

August 4, 2026

पहा धडकी भरणारा प्रसंग #viral

August 4, 2026

आता सरकारी सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही #viral

August 4, 2026

पुण्यात बाईक रायडर्सची पोलिसांनी जिरवली #viral#cmomaharashtra #marathinews

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1026691

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!