अंबड / जालना – २०२५-२६ च्या कापूस हंगामासाठी किमान आधारभूत किंमत एम.एस.पी. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व कापूस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय कपास निगम लिमिटेडने कपास किसान नावाचे आधुनिक मोबाईल अॅप विकसित केले असून कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची स्व-नोंदणी या अॅपमार्फत अनिवार्य करण्यात आली आहे.हे कपास किसान अॅप ३० ऑगस्ट २०२५ पासून Google Play Store आणि Apple iOS Store वर उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांची OTP आधारित नोंदणी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू राहील.त्यामुळे शेतकऱ्यांनी विलंब न करता आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे असे अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव कल्याण चोथे यांनी सांगितले.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले अद्ययावत जमिनीचे वैध रेकॉर्ड २०२५-२६ Online महसूल/कृषी विभागाने प्रमाणित केलेली कापूस लागवड क्षेत्राची नोंद २०२५-२६ Online
आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असलेला अद्ययावत मोबाईल नंबर,शेतकऱ्याचा फोटो
सचिव चोथे यांनी स्पष्ट केले की आगामी हंगामासाठी एमएसपीचा लाभ मिळवण्यासाठी वेळेत आणि योग्य माहितींसह नोंदणी पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
वेळ चुकल्यास शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जवळच्या अधिकृत कापूस खरेदी केंद्राशी किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





















