अक्कलकोट – अक्कलकोट तालुका हा अवर्षण दुष्काळी याही परिस्थितीत तालुक्यात सहकार रुजवण्याचा स्व. सिद्रामप्पा पाटलांनी प्रयत्न केले. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक देखील लढविल्या. कार्यकर्त्यांना दिलेली ताकद आज ही त्यांचे नांव विविध निवडणुकीत निघत असते. संघर्षमय कथा असणारे स्व. सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनानंतर विविध कार्यक्रमानिमित्त सोलापूर व नजीकच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर महायुतीतील विशेष करून भाजपाचे नेते मंडळी यांनी पाटील कुटुंब सांत्वनाकडे पाठ फिरवली आहे. अनेक जणांनी कांही अडचणी असल्याने भ्रमणध्वनी वरून सांत्वन केले. तर काही जणांनी पाटील कुटुंबाची समक्ष भेट घेतली. यामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळीचा समावेश आहे.
भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले पंचायत समितीचे सभापती माजी आमदार स्व. सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनानंतर महायुतीतील विशेष करून भाजपाचे नेते मंडळी सोलापूर व नजीकच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. मात्र पाटील कुटुंब सांत्वनाकडे पाठ फिरवल्याने जुन्या जाणत्या भाजपा पदाधिकारी यांच्या कडून नाराजी व्यक्त होत आहे. या वेळी कठीण प्रसंगी धावून येणाऱ्या नेत्यांमध्ये स्व. गोपीनाथ मुंढे सारख्यांची आठवण या निमित्ताने आवर्जून कार्यकर्त्यांना होत आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे केवळ समाजमध्यमाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. स्व. सिद्रामप्पा पाटील यांच्या सारख्या धाडसी नेत्याने भाजप कार्यकर्त्यांना नेहमीच बळ देण्याचा प्रयत्न केला. त्याकाळातील विरोधकांशी दोन हात केले, न्यायालयीन लढा दिला या संघर्ष जीवनातून कार्यकर्ता समृद्धीकडे वाटचाल करीत असल्याचे जुन्या जाणत्या भाजपा पदाधिकारी यांच्या कडून नेहमीच बोलले जाते. मात्र अश्या लोकनेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबांचे सांत्वन न होणे म्हणजे अलिकडच्या काळात प्रबोधन शिबिराकडे पाठ फिरवल्यासारखे आहे. असे जेष्ठ भाजपा नेते मंडळीतून बोलले जात आहे.


















