Monday, April 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे विभागीय शिक्षक मतदार नोंदणीमध्ये डॉ. बी.पी.रोंगे अग्रेसर !

तरुण भारतbyतरुण भारत
December 10, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणी मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळत असून पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या  जिल्ह्यात सुरु असलेल्या शिक्षक  मतदार नोंदणी उपक्रमात स्वेरी महाविद्यालय पंढरपूरचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांची प्रभावी आणि पुढाकार घेणारी नेतृत्व भूमिका विशेषत्वाने अधोरेखित होत आहे.

मतदार नोंदणीची गती वाढवण्यासाठी डॉ.रोंगे यांनी पुणे विभागातील शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षण संस्था, डी.एड./ बी.एड. महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये अशा विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन शिक्षकांशी तसेच निवृत्त शिक्षकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी नोंदणीची आवश्यकता, नियम, आवश्यक कागदपत्रे आणि वेळापत्रक याबाबत सविस्तर माहिती दिल्याने शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण झाली. या व्यापक नोंदणी मोहिमेमुळे पुणे विभागातील शिक्षकांचा लोकतांत्रिक सहभाग वाढून त्यांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षकांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी आणि धोरणांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मतदार नोंदणी अत्यंत महत्त्वाची ठरते, याकडे डॉ. रोंगे यांनी वारंवार लक्ष वेधले आहे. शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापक ,  मुख्याध्यापक, प्राध्यापक तसेच विविध शिक्षक संघटनांनी या उपक्रमाचे आणि डॉ.रोंगे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले आहे. शिक्षकांनी एकजुटीने सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेला बळ दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
——————-
चौकट :(शिक्षक नोंदणी लोकशाही सहभागाचा महत्वपुर्ण भाग- डॉ.रोंगे)
शिक्षण आणि शिक्षकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले डॉ.रोंगे यांनी या मोहिमेच्या प्रारंभापासूनच मतदार नोंदणी ही केवळ प्रक्रिया नसून शिक्षकांच्या लोकशाही सहभागाचा महत्त्वपूर्ण भाग आहे, हे स्पष्ट केले आहे.
——————-
चौकट : ( पन्नास हजार शिक्षक नोंदणीसाठी हातभार )
डॉ.बी.पी.रोंगे सर यांच्या टीमच्या माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सुमारे ५० हजार ००० शिक्षकांच्या मतदार नोंदणीस हातभार लागला आहे. पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणीला मिळालेला हा अभूतपूर्व प्रतिसाद आणि डॉ. बी. पी.रोंगे सरांचे नेतृत्व पुढील निवडणुकांमध्ये शिक्षकांचा आवाज अधिक प्रभावीपणे उमटवेल, असा विश्वास शिक्षण क्षेत्रात व्यक्त होत आहे.
—————–
चौकट – ( जिल्हानिहाय शिक्षक मतदार नोंदणीचा तपशील )
पुणे- १३ हजार ७३५.  सोलापूर- ११ हजार ३३७. सांगली ७ हजार ०५५. कोल्हापूर- ९ हजार ७९८ आणि सातारा- ७ हजार २८१

Post Views: 69
Previous Post

श्री आदी जांबमुनी मोची समाज मध्यवर्ती रथोस्तव समितीच्या अध्यक्षपदी शाम म्हेत्रे

Next Post

महर्षि प्रशालेत राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव समारंभ संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महर्षि प्रशालेत राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव समारंभ संपन्न

ताज्या बातम्या

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

सोलापूरच्या खेळाडूंना प्रिसिजनचे बळ

April 20, 2026

दहिगावच्या सुरडकर कुटुंबाची पाचवी पिढी जपत आहे ही परंपरा

April 20, 2026

सुखी जीवनासाठी संयम हीच खरी गुरुकिल्ली – मुनीश्री वीरसागर महाराज

April 20, 2026

मंठा येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव कार्यशाळा संपन्न

April 20, 2026

विचार नसलेल्या व्यक्ती समाज माध्यमात व्यक्त होत असल्याने सामाजिक प्रदूषण वाढले – प्रा. कळमकर

April 20, 2026

शिवसेनेचे अमोल शिंदे आणि काँग्रेसचे चेतन नरोटे यांना केले एक दिवसाचे निलंबित

April 20, 2026

लिंगायत स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा योजनेबाबत पहा काय म्हणाले पालकमंत्री गोरे #public #marathinews

April 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0820883

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697