Thursday, June 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळालीच पाहिजे; गव्हाणीत उड्या टाकून वेधले लक्ष

तरुण भारतbyतरुण भारत
December 12, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्या शिवाय रहात नाही. इडापिडा टळू दे-बळीचे राज्य येवू दे. अशी मागणी करीत ऊसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दर मिळालाच पाहिजे या मागणीसाठी वाखरी (ता.पंढरपूर) येथील पालखी तळावर गेल्या चार दिवसांपासून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आंदोलन करीत आहेत. जिल्ह्यातील साखरसम्राटांनी तसेच शासनाने हे आंदोलन गांभिर्याने घ्यावे यासाठी वाखरी येथे गुरुवारी (ता.११) रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. या बरोबरच येथील सिताराम कारखान्यावरील ऊसाच्या गव्हाणीत देखील शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी उड्या घेऊन आंदोलन तीव्र केले.

स्वाभीमानी शेतकरी संघटनेसह इतर सर्व शेतकरी संघटनेने एकत्रितपणे सोलापूर जिल्ह्यातील साखऱ् कारखान्यांनी उसाला प्रतिटन ३ हजार ५०० रुपये दर मिळावा यासाठी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन वाखरी येथे सुरु असलेल्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. 

या संदर्भात बेमुदत उपोषणास बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी समाधान फाटे यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्यांनी अद्याप ऊसाचा दर जाहीर केलेला नाही. राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याचा नावलौकीक आहे. मात्र हाच जिल्हा उसदर घोषित करण्याबाबत अद्याप मागे आहे.


एकीकडे शेजारील सातारा जिल्ह्यातील कारखान्यांना आपल्याच जिल्ह्यातील काही भागातून उस पुरवठा होत आहे. या उसाला ३ हजार ५०० रुपयांचा दर भेट आहे. विशेष म्हणजे या कारखान्यांना ऊस नेत असताना लांबची वाहतूक आहे. मग आपल्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना तेवढाच उसदर देण्यासाठी काहीच अडचण असण्याचे कारण नाही असा सवाल देखील उपोषणकर्ते समाधान फाटे हे उपस्थित करीत आहेत. परवा दिवशी समाधान फाटे यांची प्रकृति देखील बिघडली होती. मात्र तरी देखील ते उपोषणावर ठाम आहेत. 

दरम्यान उस आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच गुरुवारी (ता.११) येथील आंदोलनकर्ते तसेच शेतकऱ्यांनी वाखरी येथे रास्तारोको आंदोलन केले. यावेळी सातारा तसेच पुणेकडे जाणारी वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती. या बरोबरच शेतकरी संघटनेच्या दीपक भोसले, सचिन पाटील तसेच शेतकरी नेते दीपक पवार यांनी सिताराम कारखान्यावर देखील आंदोलन छेडले. यावेळी या मंडळींसह शेतकऱ्यांनी उसाच्या गव्हाणीत उड्या घेत आंदोलन केले.

यावेळी पोलिस आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या मध्ये काहीकाळ तुतु मैमै झाले. मात्र तरी देखील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
दरम्यान येत्या एक, दोन दिवसांमध्ये उस दराची ही कोंडी फोडली नाहीतर सोलापूर जिल्ह्यातील एक देखील कारखाना सुरु ठेवला जाणार नाही असा इशारा देखील यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे साखरसम्राटांकडून किंवा शासनाकडून येथील उसदराची कोंडी फोडण्यासाठी काय भूमिका घेतली जाते याकडे आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरीबांधवांचे लक्ष लागले आहे.
——————-


ज्या तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ केले त्याच जगतगुरु श्री संत तुकाराम महाराजांची पालखी वाखरी येथील पालखीतळावर ज्या ठिकाणी विसावते त्याच पालखीतळाच्या पायथ्याशी आम्ही बेमुदत आमरण उपोषण करीत आहोत. त्यामुळे ऊसदराची कोंडी फोडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील साखरसम्राटांना सुबुध्दी देवो हीच श्री विठ्ठलरुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकोबारायांच्या चरणी आमची प्रार्थना आहे.
समाधान फाटे ( उपोषणकर्ते )  

Post Views: 43
Previous Post

हरेश म्हेत्रस यांची लेखा अधिकारी -१ या पदावर पदोन्नतीने जिल्हा परिषद येथे पदस्थापना

Next Post

बेगम पेठसह शहरात तीन ठिकाणचे अतिक्रमण हटविले; कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांसमवेत शाब्दिक चकमक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बेगम पेठसह शहरात तीन ठिकाणचे अतिक्रमण हटविले; कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांसमवेत शाब्दिक चकमक

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915682

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697