Tuesday, April 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विविध योजनांअंतर्गत सुमारे १५४ कोटी रुपयांच्या ५०० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन

तरुण भारतbyतरुण भारत
December 16, 2025
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांअंतर्गत सुमारे १५४ कोटी रुपयांच्या ५०० हून अधिक विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते  झाले.

      या कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे,आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, शशिकांत चव्हाण, रोहिणी तळवडकर,अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

       हा उद्घाटन व लोकार्पण सोहळा सोलापूर महानगरपालिका प्रांगणात पार पडला. यामध्ये राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रम (NCAP), जिल्हा नागरोत्थान योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, दलित वस्ती सुधार योजना, चलित नागरी वस्ती सुधारणा योजना, माझी वसुंधरा अभियान ४.०, शाळांचे सुशोभीकरण तसेच स्वच्छ सोलापूर मिशन अंतर्गत विविध कामांचा समावेश होता.या योजनांतर्गत शहरातील नागरी वस्ती, रस्ते, स्वच्छता, पर्यावरण, शालेय सुविधा व सार्वजनिक सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यात आल्या असून नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होणार आहे.

        याप्रसंगी बोलताना पालकमंत्री गोरे   यांनी सांगितले की, सोलापूर शहरास ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित’ बनवण्यासाठी शासनाकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट केले. महानगरपालिकेने नवीन अत्याधुनिक स्वीपर मशीन्स उपलब्ध केल्यामुळे, शहराच्या स्वच्छतेवरील अतिरिक्त ८ लाख रुपये मासिक खर्च वाचणार आहे.सांडपाणी पुनर्वापर: कचरा संकलन व सांडपाणी पुनर्वापरासाठी  प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामुळे शहरातील ७० टक्के सांडपाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध करण्याचे लक्ष्य आहे.शौचालय सुविधा: शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या प्रश्नासाठी १०.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, लवकरच या समस्येचे पूर्ण समाधान केले जाईल.यावेळी प्रमुख विकास कामांचा माहिती व महापलिकाच्या १४० सेवा ऑनलाइन स्वरूपात नागरिकांसाठी उपलब्ध आहेत याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली

  एकूण उद्घाटन झालेल्या कामे अशी – 

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम (४२ रस्त्यांचे काम) कामे ४२ रक्कम ३९.९२कोटी 

दलितेतर नागरी वस्ती सुधारणा (कामे ४७)रक्कम  ४०.६० 

 जिल्हा नगरोत्थान योजना (रस्ते, ड्रेनेज) ( कामे १४१,) रक्कम २५.९७ कोटी 

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे ना.व.सु. योजना ( कामे १०४) , रक्कम २१.३९ कोटी

महानगरपालिका नागरी सेवा व सुविधा पुरवणे योजना (३५ कामे) ६. ७२ कोटी,

जिल्हास्तर दलितेतर योजना १३ घंटागाडीचे लोकपर्ण

माझी वसुंधरा अभियांन ४. ० अंतर्गत हरीत पट्टा (काम ३)  १ कोटी

मनपा स्वनिधीतून शौचालय नूतनिकरण (१४० काम)१०. ५८ कोटी

मनपा स्वनिधीतून स्वीपर मशीन (१)७. ८० कोटी..

Post Views: 70
Previous Post

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकास अपहरण करुन २ कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी ९ जणांची निर्दोष मुक्तता

Next Post

सांगोल्यात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी साजरी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोल्यात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी साजरी 

ताज्या बातम्या

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

April 21, 2026

भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्त पारंपारीक वाद्यासह मिरवणूक

April 21, 2026

मॉरिशस शांती परिषदेसाठी डॉ.महावीर शास्त्री दाम्पत्यांना आमंत्रण

April 21, 2026

राजेश पवार यांची राष्ट्रीय बंजारा परिषद प्रदेश प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला

April 21, 2026

प्रा. चरणसिंह कायटे यांचे दुहेरी यश

April 21, 2026

सोलापूर शहरात पावसाची हजेरी

April 21, 2026

हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट बंधनकारक – डॉ. नीलाभ रोहन

April 21, 2026

राज्य कर्मचारी शिक्षक बेमुदत संपावर

April 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0822457

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697