अक्कलकोट – तालुक्यातील घोळसगाव येथील स्वयं जागृत नवसाला पावणारा सर्व धर्मीय श्रद्धास्थान शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान शनी अमावस्या यात्रा महोत्सव निमित्य शुक्रवार १९ डिसेंबर पासून देशभक्ती सह विवध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती पंच कमिटी अध्यक्ष आप्पासाहेब किवडे यांनी दिली आहे.
जय भारत माता सेवा समिती राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात शनी अमावास्या यात्रा महोत्सव कार्यक्रम नेहमी भक्ती भावनेने मोठ्या उत्साहात साजरी केल्या जातात.प्रत्येक शनी अमावस्या यात्रेस तुळजापूर, उमरगा, आंळद व अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.यामुळे यंदा यात्रा कमिटीचे वतीने शनी अमावास्या यात्रेची जयत्त तयारी करण्यात येत आहे.
शुक्रवार १९ रोजी रात्रभर भजन,भारुड,गी गी पदा आदी भरगच्च देशभक्ती कार्यक्रम आयोजित केले असून शनिवार २० रोजी पहाटे श्री चे महापूजा, महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन इत्यादी कार्यक्रम होणार असून सकाळी सात वाजता घोळसगाव ग्राम प्रदिक्षण करीत श्रीचे भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्य समवेत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान पर्यत निघणार आहे.
यानंतर सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज दर्शन सोहळा, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी सद्गुरूचा दर्शन आणि महाप्रसादचा आवश्य लाभ घ्यावी असे आवाहन यात्रा कमिटी सचिव राजेंद्र काळे यांनी केले आहे.


















