सोलापूर – महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तौफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर स्वर्गीय हारून सय्यद यांचे चिरंजीव अबुबकर सय्यद आणि नुरूद्दीन मुल्ला यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी इंदापूर येथील भरणेवाडी येथे सोलापूर राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
यावेळी दत्तात्रेय भरणे यांनी अबुकर सय्यद, नुरूद्दीन मुल्ला, मुसा शेख, जुनेद शेख, मुसेब सय्यद, अहमद मुल्ला तसेच सर्फराज पटेल यांच्या गळ्यात राष्ट्रवादी पक्षाचे उपरणे घालून त्यांचे स्वागत केले. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची वाढलेली संख्या लक्षात घेता यंदा राष्ट्रवादीला मोठे यश मिळेल, असा विश्वासही संपर्कमंत्री भरणे यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर – जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते तौफिक शेख,प्रदेश सरचिटणीस खलील शेख,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, शामराव गांगर्डे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
















