सोलापूर – दि. २२ डिसेंबर २०२५: कार्पोरेट ऑफिसच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र परिमंडल मुंबईचे आदरणीय श्री. महारुद्र हंचाटे साहेब, OSD सर्कल ऑफिस मुंबई यांनी सोलापूरला भेट देऊन मा. CGM साहेबांचा सकारात्मक संदेश अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवला.
बाळीवेस टेलिफोन भवन येथील बैठकीत त्यांनी फायबर टू द होम (FTTH) कनेक्शन्स वाढवणे, उत्पादनांचे प्रभावी मार्केटिंग, ग्राहक शंकांचे तात्काळ निराकरण आणि दर्जेदार सेवा ही सामूहिक जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.हंचाटे साहेब म्हणाले, “सर्कल ऑफिसकडून प्रगतीवर सतत लक्ष आहे. उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करावे.” सोलापूर बीएसएनएलमधील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्पोरेट ऑफिसला पूर्ण सहकार्य देण्याचा ठाम संकल्प केला.
या बैठकीत मा. श्रीकांत मब्रुखाने महाप्रबंधक, मा. विठ्ठल कुलकर्णी उपमहाप्रबंधक, कार्यालय अधीक्षक सुजित हावळे, अनिता पाटील, नितीन माने, उमेश शिंदे, श्रीधर अतनूर, संतोष जेटगी, बिराजदार, त्रिंबके, रवी लिंगनूर, प्रवीण कवडे, राजेश तेलगावकर, अमित पोटफोडे, रमेश दिबुले, कुमार आळगीकर, मनोज शिंदे, प्रशांत कवडे, अंकोलीकर उपस्थित होते. प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.















