Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाळवंटातील दशक्रिया विधीचे ठिकाण बदलण्याची गरज, नमामी चंद्रभागा योजनेचा उडाला बट्याबोळ

तरुण भारतbyतरुण भारत
December 24, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ।। जन्मोजन्मांतरी हेचि घडो मज । मागणे श्रीहरि नाही दुजे ।। या भावनेने विठुरायाच्या दर्शनासाठी, पवित्र चंद्रभागेच्या स्नानाची पर्वणी लुटण्यासाठी भाविक येथे लाखोंच्या संख्येने येत असतात.

येथील चंद्रभागेच्या पात्रात अगोदरच सर्वत्र घाणीचे साम्राज्य असताना त्या मध्ये आणखीन भर पडते ती दशक्रिया विधी नंतरचे आवास्तव पडलेले केस, पिंडदानासाठींचे भाताचे गोळे, चिंध्यांचे ढिगार्यांची. या मध्येच सर्वात कहर म्हणून दशक्रिया विधीचा भाग असलेले मुंडन केल्या नंतर वाळवंटात टाकून दिलेल्या ब्लेड किंवा रेजची पाने तसेच या पानांच्या अर्ध्यां तुकड्यांमुळे अनवाणी प्रदक्षिणा पुर्ण करणाऱ्या भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.


येथील चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटा मध्ये सगळीकडे चिंध्याचे ढिग, निर्माल्य, भग्न अवस्थेमधील देवदेवतांच्या मुर्ती, नारळाच्या शेंड्या, कुजलेल्या अवस्थेमधील अन्नांचे ढिग, द्रोणपत्रावळींचे पडलेले ढिग, भाविकांनी पहाटेच्या वेळी उरकलेले प्रातविधीचे कार्यक्रम यामुळे प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येते.
——————————–


मृतांच्या नातेवाईकांची दररोज असते मांदियाळी  
या मध्येच पवित्र वाळवंटा मध्ये दशक्रिया विधी करण्यासाठी मृतांच्या नातवाईक मंडळींची दररोज मोठी मांदियाळी होत असते. पांडुरंगाच्या येथील वास्तव्यामुळे पंढरपूर ही अध्यात्मिक नगरी किंवा देवभूमी म्हणून देखील प्रसिध्द आहे.त्यामुळेच फक्त सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातून देखील मृतांच्या नातेवाईक मंडळींची येथीलव वाळवंटा मध्ये दररोज मोठी वर्दळ असते.
——————————


दशक्रिया विधी पात्रातील सुनियोजित जागेवर करावेत
वाळवंटातील पुंडलिक मंदिरा जवळ हे सर्व कार्यक्रम अगदी बिनदिक्कतपणे चाललेले असतात. त्यामध्ये पिंडदान, मयतांच्या नातेवाईक मंडळींचे मुंडण करणे अशा प्रकारच्या कार्यक्रमांची उघड्यावरच रेलचेल असते. त्यामुळे असे विधी चंद्रभागा नदीच्या एखाद्या सुनियोजित भागात केले जावेत. या बरोबरच नदीच्या पात्रात सर्रास म्हशी, गायी आदी जनावरे धुणे, भाविक किंवा शहरातील नागरिक आपली दुचाकी, चारचाकी गाड्यांची देखील नदीच्या पात्रात स्वच्छता करीत असतात.
——————————-


चंद्रभागेचे नंदनवन होणार तरी कधी
एकीकडे आपल्या जवळ असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा नदीच्या काठावरील प्रितिसंगमाचे यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळाचे तर दुसरीकडे देशातील कन्याकुमारी येथील अथांग पसरलेल्या समुद्राच्या संगमावरील विवेकानंदांच्या स्मारकाचे उदाहरण दिसत आहे. मात्र ही दोन्ही उदाहरणे डोळ्या समोर असताना महाराष्ट्राची दक्षिणकाशी आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री विठुरायाची भुवैकुंठ नगरी समजल्या जाणाऱ्या चंद्रभागेच्या वाळवंटाचे आपण नंदनवन करु शकत नाही ही बाब अतिशय खेदाची आहे.
—————————


नमामी चंद्रभागा अभियानाचा उडाला बोजवारा
नमामी गंगेच्या धर्तीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमामी चंद्रभागा अभियानाची घोषणा केली. या योजनेसाठी काही कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करुन अगदी उगमा पासून ते राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे कर्नाटक राज्यापर्यंत वाहणाऱ्या चंद्रभागेचा विकास करण्याचे उद्दिष्ठ डोळ्या समोर ठवलेले होते. मात्र देवेंद्र फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत तरीही  या योजनेला अद्यापही गती मिळाली नाही. 

Post Views: 58
Previous Post

शिवसेना उबाठा पक्षाकडे २२४ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

Next Post

सौर ऊर्जा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिला शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सौर ऊर्जा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महिला शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

ताज्या बातम्या

बार्शीत महिलेचे २ ग्रॅमचे सोन्याचे मणी मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

August 2, 2026
मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

मंगळवेढ्यात शिवसैनिक आक्रमक! खासदार संजय राऊतांच्या भूमिकेला पाठिंबा देत युवासेनेकडून प्रतिमेला ‘दुग्धाभिषेक

August 2, 2026
संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

संजय राऊत यांच्या वक्तव्याविरोधात महायुतीचे आंदोलन

August 2, 2026

योगेश कबाडे यांची मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेच्या मुख्याधापक पदी निवड 

August 2, 2026
जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

जिजाऊ गुरुकुलची पहिली पालक सभा उत्साहात संपन्न

August 2, 2026
गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

गुरूंच्या आदर्शांचा अंगीकार केल्याशिवाय आत्मविकास अशक्य : महासती निर्मलाजी म.सा.

August 2, 2026
महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

महसूल विभागाचे निर्णय लोकहिताचे…. आ . उत्तमराव जानकर 

August 2, 2026
श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

श्रीकांत बंडगर यांची ‘पंजाब कुस्ती कोच’पदी शासकीय निवड

August 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1023756

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!