वळसंग – येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय गणित दिवस उत्साही वातावरणात संपन्न झाला.याप्रसंगी सर्वप्रथम थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य वीरेश थळंगे व पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.
पूजनानंतर संस्कृती हंजगे व समृद्धी साळे यांनी आपल्या भाषणातून श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी माहिती सांगितले.सहशिक्षक संजयकुमार धनशेट्टी यांनी आपल्या मनोगतातून गणित दिनाचे महत्त्व सांगून श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित विभागातील सिध्दाराम भैरामडगी, विजय प्याटी, विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ,कर्मचारी कट्टेप्पा कोळी व इतर सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार यांनी केले.



















