नवीन नांदेड – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी दिनांक २९ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यालय सिडको येथे प्रभाग क्रमांक १९ व २० मधून २७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांनी दिली.
सिडको हडको नवीन नांदेड भागातील प्रभाग क्रमांक १९ व प्रभाग क्रमांक २० मधील एकूण पाच नगरसेवकांच्या जागेसाठी दिनांक २९ डिसेंबर रोजी सोमवारी तीन वाजेपर्यंत प्रभाग क्रमांक १९ मधून १६ व प्रभाग क्रमांक २० मधून ११ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आज रोजी पर्यंत अर्ज विक्री ही ३९५ एवढी झाली असून अर्ज दाखल मात्र २७ एवढी झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांनी दिली आहे. उमेदवारी नामनिर्देशन पत्र तपासणी साठी प्रभाग क्रमांक २० साठी दोन टेबल वरून नाम निर्देशन पत्र तपासल्या जात असत असून प्रभाग क्रमांक २० साठी देखील दोन टेबल वरून तपासले जात आहेत व नंतर नामनिर्देशन पत्राची प्राथमिक तपासणी टेबल एक एक वरून झाल्याने अंतिम तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षेत करण्यात येत आहे.
नामनिर्देशन पत्रात कुठलेही तुरटी राहू नये याची दक्षता पुरेपूर निवडणूक आयोगाने घेतल असल्याचे दिसून येते.पक्षाच्या युतीचा प्रश्न मार्गी लागला नसल्यामुळे सर्व उमेदवारांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विलंब होत असल्याचे चित्र दिसून येते.

























