टेंभुर्णी : प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी उपाध्यक्ष धनंजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेमध्ये सन २०२६ साठी प्रेस क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.
सभेत अध्यक्षपदी सतीश विठ्ठल चांदगुडे, उपाध्यक्षपदी विष्णू भाऊ बिचकुले, सचिवपदी राजेंद्र कांतीलाल केदार, तर खजिनदारपदी अनिल भागवत जगताप यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीच्या निवडीचा प्रस्ताव सोपान ढगे यांनी मांडला असून त्यास सुहास साळुंखे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व पत्रकार सदस्यांनी या निवडीस एकमताने पाठिंबा दिला.
यावेळी नूतन उपाध्यक्ष विष्णू बिचकुले यांची आंतरराष्ट्रीय हिंदू सनातन महासभेच्या महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. सभेदरम्यान उपस्थित सदस्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वार्षिक सभेस डी. एस. गायकवाड, सदाशिव पवार, सोपान ढगे, सुहास साळुंखे, गणेश चौगुले, सतीश काळे, धनंजय मोरे, सचिन होदाडे, अनिल जगताप, सुरज देशमुख यांच्यासह अनेक पत्रकार सदस्य उपस्थित होते.
सभेच्या शेवटी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व सदस्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. टेंभुर्णीतील पत्रकार संघटनेच्या बळकटीसाठी व पत्रकार हितासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला व सभा उत्साहात संपन्न झाली.
















