बार्शी – बार्शी शहरातील पारधी कॅम्प, सोलापूर रोड परिसरात गांजा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे बार्शी शहर पोलिसांनी मंगळवार रोजी कारवाई केली. या कारवाईत संगीता धर्मा पवार (वय ४०, रा. पारधी कॅम्प, सोलापूर रोड, बार्शी) या महिलेकडून २१३.२८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मंगळवारी दुपारी संशयित महिला पोलिसांना आढळून आली. गांजा कोठून आणला, याबाबत विचारणा केली
असता, आपला मुलगा आदेश पवार हा मोटारसायकलवरुन गांजा आणत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी महिला पोलीस हवालदार शबाना कोतवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगीता पवार आणि तिचा मुलगा आदेश पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Views: 11