सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील श्री चौडेश्वरी पतसंस्थेकडून तिसर्या वर्धापनदिन व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून टाकळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिराचे उद्घाटन भाजपाचे तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, डाॅ. संगमेश्वर पाटील, डाॅ.उमेश सुरळे, नळदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सिध्देश्वर ब्लड बॅंकेचे योगेश्वर कवेकर, पतसंस्थेचे चेअरमन सिध्दाराम बगले, संस्थापक संतोष मधुरे लाड, व्हाईस चेअरमन रवींद्र तावसकर, संचालक राहुल झेंडेकर, जट्यप्पा कोळी, सागर बगले, अंबाजी बगले, सतीश मधुरे, महेश मधुरे, परशुराम कोळी, अशोक बिराजदार, संगमेश्वर बगले, चिंचपूरचे सुरेश बगले, शाखाधिकारी संजय पाटील यांच्यासह पतसंस्था पदाधिकारी, सभासद व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















