बार्शी – आठरा पगड जाती १२ बलतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शिवरायांना प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊंनी दिली.
ज्या काळामध्ये मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही या सर्वांनी सत्तेचा उन्माद महाराष्ट्रामध्ये मांडला होता. मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत होत्या. त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देऊन १८ पगड जाती १३ बलुतेदारांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देऊन मानवतेला भूषण वाटावे, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीच्या तु-यातून जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली.
या छत्रपती शिवराय व संभाजी महाराजांच्या जीवनातून आपण प्रेरणा घेऊन आयुष्याचा प्रवास करायला हवा, असे प्रतिपादन यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष आनंद काशीद यांनी केले.
यावेळी प्रतिमापूजन सामाजिक कार्यकर्त्या शितल मांजरे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विक्रम बापू गायकवाड, मनोज मोरे, इमामभाई लांडगे, सय्यद, राजवीर काशीद यांच्यासह मोठ्या संख्येने जिजाऊ प्रेमी उपस्थित होते.


















