सोलापूर – नोव्हेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी ३५ परीक्षार्थी होते. या परीक्षामध्ये एलिमेंटरी परीक्षार्थींचे शंभर टक्के निकाल लागला आहे. अथर्व रावत, अयान आवटे, खुशी शिकलगार ,साक्षी कटकधोंड, श्रावणी कटकधोंड, वैभवी स्वामी या विद्यार्थ्यांना ए श्रेणी तर आलिया शेख, ऐश्वर्या माळी,जास्मिन लिगेवान,महेक अत्तार ,पूजा केवटे, प्रकाश राठोड, प्रतीक्षा राजमाने, समीक्षा धुळखेडे, संचिता वाघमोडे, श्रावणी साठे, स्वराली केवटे या विद्यार्थ्यांना बी श्रेणी मिळाली.
इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी विद्यालयातून ४३ विद्यार्थी होते शंभर टक्के निकाल लागला असून अमरीन शेख, अनुष्का वाघमोडे,प्रगती विजापुरे, प्रियंका काळे, रूकमोद्दीन शेख, रुकसार शेख,श्रुतिका म्हेत्रे,सोनाली रावत या विद्यार्थ्यांना ए श्रेणी तर आयेशा मोमीन, आदिती पुजारी, आलिया नदाफ,अंकिता लांडगे, धानेश्वरी जोडमोटे,कौसर शेख, प्रणिती वाघमारे, ऋतुजा केवटे, सफिना शेख,साक्षी धोत्रे, सानिका कोरे, श्रावणी व्हनमाने, सृष्टी घाले, वैभवी भागवत, वैष्णवी म्हेत्रे या विद्यार्थ्यांना बी श्रेणी मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांना कलाध्यापक भालचंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

















