Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्यपूर्व फेरीत  दाखल; ५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in sports
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

काझीपेठ  :  येथील रेल्वे ग्राउंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेने पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तेलंगणा खो-खो असोसिएशनच्या आयोजनाखाली देशभरातील बलाढ्य संघांनी मैदानात उतरून कौशल्य, वेग, चपळाई आणि रणनीतीचा अफलातून संगम सादर केला. प्रारंभीच्या सामन्यांतच महाराष्ट्र, कोल्हापूर, रेल्वे आणि छत्तीसगड संघांनी जोरदार विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण केली आणि दिमाखात उपउपांत्यपूर्व फेरीत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला. 

पुढील संघांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली पुरुष गट : महाराष्ट्र, रेल्वे, पुद्दुचेरी, उत्तर प्रदेश, कोल्हापूर, गुजरात, ओडिशा, विदर्भ, केरळ, दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा.

महिला गट : महाराष्ट्र, ओडिशा, विदर्भ, विमानतळ, पंजाब, दिल्ली, राजस्थान, कोल्हापूर, गुजरात, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू

——-

महिला गटात महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व  चंदीगडवर दणदणीत विजय

महिला गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर ४४–१० असा १ डाव ३४ गुणांनी दणदणीत विजय मिळवून गटात अव्वल स्थान पटकावले. ड्रीम रनद्वारे ८ गुण मिळवण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरला. महाराष्ट्राकडून सरीता दिवा (२.५० मि. संरक्षण व २ गुण), सुहानी धोत्रे (१.३० मि. संरक्षण व ८ गुण), रेश्मा राठोड (२ मि. संरक्षण व ६ गुण), प्रियांका इंगळे (१.१० मि. संरक्षण व १४ गुण), संध्या सुरवसे (२.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी मोलाची कामगिरी नोंदवली. उत्तर प्रदेशकडून अंजु यादव (१ मि. संरक्षण) व शिवानी (२ गुण) यांनी लढत दिली.

महिला गटातच महाराष्ट्राने चंदीगडचा ४२–१२ असा १ डाव ३० गुणांनी पराभव केला. या सामन्यात श्वेता नवाले (१.५०, १.५० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (२.२० मि. संरक्षण व २ गुण), प्रियांका इंगळे (१.५० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ सादर केला. चंदीगडकडून रितू (१ मि. संरक्षण व २ गुण) हिने चांगली कामगिरी केली.

——-

पुरुष गटात महाराष्ट्रचा  उत्तर प्रदेशवर व जम्मू–काश्मीरवर धुव्वा 

पुरुष गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशवर २५–१५ असा ५ मिनिटे राखून १० गुणांनी विजय मिळवला. महाराष्ट्राकडून सुयश गरगटे (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), निहार दुबळे (४ गुण), प्रतीक वायकर (२.०० मि. संरक्षण), ऋषिकेश मुर्चावडे (२.१० मि. संरक्षण) यांनी चमकदार कामगिरी केली. उत्तर प्रदेशकडून मोहित पाल (४ गुण), आशिष (२.० मि. संरक्षण व २ गुण), रोहित पाल (१.३० मि. नाबाद व २ गुण) यांनी एकाकी झुंज दिली.

दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने जम्मू–काश्मीरचा ४८–१४ असा १ डाव ३४ गुणांनी धुव्वा उडवला. विजय शिंदे (२.५० मि., १.२० मि.), सुयश गरगटे (३.०० मि.), शुभम थोरात (१.१० मि. संरक्षण व ६ गुण), रुद्र थोपटे व प्रतीक वायकर (प्रत्येकी ६ गुण) यांनी सामना आपल्या नावावर केला.

—–

कोल्हापूरचा दमदार विजय

पुरुष गटात कोल्हापूरने त्रिपुरावर ४९–६ असा १ डाव ४३ गुणांनी मात केली. कोल्हापूरकडून विराज गलगटे (१.४० मि. संरक्षण), राजवर्धन (२.१० मि. संरक्षण व २ गुण), मजहर जामदार (१० गुण) यांनी प्रभावी खेळ केला. त्रिपुराकडून सागर मिहा व अभिजी नाम्हे (प्रत्येकी २ गुण) यांनी आक्रमणात योगदान दिले.

——

महिला गटात कोल्हापूरचा  बिहारवर मोठा विजय

महिला गटात कोल्हापूरने बिहारचा ५६–६ असा १ डाव ५० गुणांनी पराभव केला. अमृता बाबासो (१.२०, ३.४० मि. संरक्षण व १४ गुण), श्रावणी लक्ष्मुण (५.४० मि. संरक्षण व १० गुण), श्रेया राजगोंडा (६ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. बिहारकडून रिया रानी (१ मि. संरक्षण) हिने चांगली कामगिरी केली.

Post Views: 85
Previous Post

एमआयटी सिनियर कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धा सप्ताह उत्साहात साजरा

Next Post

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

ताज्या बातम्या

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर भालो युवा महासंघाचे आंदोलन स्थगित;१५ दिवसांत प्रश्न सोडविण्याची मागणी

September 24, 2026

श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या बाल चिमुकल्यांकडून गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जना

September 24, 2026

पंढरपुरात अपर जिल्हाधिकारीकार्यालय कार्यान्वित #viral #news #solapurnews

September 24, 2026

उजनीच्या पाण्याबद्दल हे बोलले मुख्यमंत्री #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

आता रुग्ण कुठेही घेऊ शकतात औषध बंधन नाही #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

अजित सृष्टी देखावा पाहून ढसाढसा रडले पार्थ पवार #marathinews #news #viral

September 24, 2026

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1252316

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!