Wednesday, March 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री सिद्धरामेश्वरांचा जयघोष अन् चैतन्यमय वातावरण;  मिरवणूक मार्गावर भाविकांच्या भक्तीचा उसळला महापूर 

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धेश्वर महाराज की जय… जय घोषाने सारा परिसर दुमदुमला होता..मिरवणूक मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या, बँड ढोलीबाजा आणि कृत्रिम हत्ती चिमुकलांचे लक्ष वेधून घेत होते. बाराबंदी पोशाख परिधान केलेले चिमुकले बालक मिरवणूक मार्गावर श्रींचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. रस्त्याचे दुतर्फा भाविकांची एकच गर्दी होती.. औचित्य होते, ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याचे….

        ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्यासाठी मानाची पालखी आणि सातही नंदीध्वज यात्राप्रमुख हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विधिवत धार्मिक विधी संपन्न केल्यानंतर अक्षता सोहळ्यासाठी मिरवणूक मार्गावर मार्गस्थ झाले. या मिरवणूक मार्गावर विविध मानकऱ्यांना धर्माध्वज, पंचरंगीध्वज, बैलगाडी, दिवटे, आणि कुंभार मानकराकडे मातीचे गाडगे सुपूर्द करण्यात आले. मंगल वाद्यांच्या तालावर आणि श्रींच्या मधुर गीतांवर मिरवणूक मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी भाविकांकडून मानांच्या पालखीचे तसेच सातही नंदी ध्वजाचे पूजन करण्यात आले. काहींनी खारीक खोबऱ्याचे तर काहींनी लिंबूचे हार मानाच्या नंदीध्वजांना अर्पण केले. मुखी सिद्धरामेश्वरांचा जयघोष करत मिरवणूक हळूहळू अक्षता सोहळ्यासाठी मार्गस्थ झाली. रस्त्याच्या दुतर्फा महिला भाविकांचे औक्षणाचे ताट घेऊन गर्दी होती. प्रत्येक महिला श्रींचे दर्शन घेण्यासाठी तसेच ओवाळणी करण्यासाठी आसुसलेले होते. भाविकांनी पालखीतील श्रींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्प अर्पण केले. तर मानाच्या नंदीध्वजाला देखील हार अर्पण करून पूजा केली.

        दरम्यान, हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सुरू झालेली ही मिरवणूक कुंभारवाडा, दाते पंचांग, दत्त चौक, सोन्या मारुती चौक जुनी फौजदार चावडी, माणिक चौक, आजोबा गणपती, विजापूर वेस, जुनी कलेक्टर कचेरी येथे सरकारी आहेर देण्यात आला. त्यानंतर मार्कंडे मंदिर, सिद्धेश्वर प्रशाला मार्गे श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गक्रमण केली. यावेळी नंदीध्वजाच्या मागोमाग अनेक भाविक मार्गस्थ झाले. यावेळी सर्वत्र आनंदाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण होते. 

 

चिमुकल्यांनी परिधान केला बाराबंदी पोशाख 

अक्षता सोहळ्यासाठी मार्गावर चिमुकल्यांनी पारंपारिक श्रींचा बाराबंदी पोशाख परिधान केला होता. हातामध्ये छोटा नंदीध्वज घेऊन श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी महिला देखील पारंपारिक वेशभूषामध्ये श्रींच्या दर्शनासाठी उपस्थित होत्या. 

 

अक्षता सोहळ्याच्या मिरवणूक मार्गावर कृत्रिम हत्तीने लक्ष वेधून घेतले 

श्री सिद्धरामेश्वर यांच्या अक्षता सोहळ्याच्या मिरवणुकीसाठी सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हळदे बँड, तसेच इतर बँड आणि ढोलीबाजादेखील उपस्थित होते. यांचे गीत गाऊन मंगलमय वातावरण तयार केले होते. याच मिरवणूक मार्गावर हाके बंधू यांच्याकडून कृत्रिम हत्ती साकारण्यात आला होता. त्या हत्तीवर सिद्धरामेश्वरांची प्रतिमा विराजित करण्यात आली होती. हा श्रींचा कृत्रिम हत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. चिमुकल्यांनी कुतूहलाने हत्ती सोबत फोटो काढले.

 

संस्कार भारतीच्या वतीने आकर्षक रांगोळीच्या पायघड्या 

सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील संस्कार भारती या संस्थेच्या वतीने मिरवणूक मार्गावर आकर्षक अशी रांगोळी साकारण्यात आली होती. हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून ते संमती कट्टा अक्षता सोहळ्याच्या मिरवणूक मार्गावर सर्वत्र रांगोळीच्या पायघड्या साकारण्यात आल्या होत्या. 

Post Views: 59
Previous Post

प्रभाग १३ मध्ये भाजपचे महाशक्तीप्रदर्शन रोडशो; ढोल-ताशा, फटाक्यांत विकासाचा जयघोष

Next Post

कोळा वाघडोह वस्ती जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कोळा वाघडोह वस्ती जिल्हा परिषद शाळेत भरला आनंद बाजार

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

March 11, 2026
मनपा प्राथमिक देशमुख वस्ती शाळेस साऊंड बॉक्स भेट

मनपा प्राथमिक देशमुख वस्ती शाळेस साऊंड बॉक्स भेट

March 11, 2026
रस्त्यावरील उभी वाहने, अतिक्रमण, अरुंद रस्ते; वाहनांना वळण घेणे होतेय धोकादा

रस्त्यावरील उभी वाहने, अतिक्रमण, अरुंद रस्ते; वाहनांना वळण घेणे होतेय धोकादा

March 11, 2026
ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

March 11, 2026
चपळगावात ‘होम मिनिस्टर’ सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह

चपळगावात ‘होम मिनिस्टर’ सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह

March 11, 2026
साखरेचे हार किंवा गाठीच्या किंमतीत २० ते ३० टक्के वाढ

साखरेचे हार किंवा गाठीच्या किंमतीत २० ते ३० टक्के वाढ

March 11, 2026
जागतिक महिला दिनानिमित्तमहिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

जागतिक महिला दिनानिमित्तमहिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

March 11, 2026
डॉ. उम्मे यशफिन शिले़दार यांची फिजिओथेरपी पदवीत उज्ज्वल यश

डॉ. उम्मे यशफिन शिले़दार यांची फिजिओथेरपी पदवीत उज्ज्वल यश

March 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0724180

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697