हिंगोली नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील कर्मचारी हिंगोली शहरात सिंगल युज प्लास्टिक बंदी हि 100% करण्याच्या दृष्टीकोनातून विविध उपाय योजना करीत आहेत. तसेच सदर कामात यश सुद्धा प्राप्त झाले आहे.परंतु नागरिकांना प्लास्टिक कॅरीबॅग बंद केल्या नंतर त्या एवजी कापडी पिशवी हि सहज व योग्य दारात उपलब्ध होण्याच्या उद्देशाने नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी ATM क्लोथ बॅग मशीन शहरात मुख्य ठिकाणी बसविण्याचे आदेश दिले आहेत.अश्या प्रकारचा उपक्रम हा मराठवाड्यात प्रथमच करण्यात येत आहे.सदर मशीन हि लाईट व सौरऊर्जा या दोन्ही पद्धतीने कार्य करणार आहे. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास सुद्धा सदर मशीन सुरु राहील व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची योग्य दक्षता घेण्यात आली आहे.
हिंगोली शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे.त्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत कचरा वर्गीकरण,घरघुती व सार्वजिनक शौचालयाचे वापर, होम कंपोस्टिंग अक्षय उर्जा, सौर उर्जेचा योग्य वापर, झाडांचे संगोपन व संवर्धन, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर,पाण्याचे योग्य वापर करणे, एकदाच वापरात येणारे सिंगल युज प्लास्टिक, कॅरीबॅग,Styrofoam आणि Thermocol यांच्या उत्पादन, वापर विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक यावर सुद्धा पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.
याबाबत पालिकेमार्फत वेळोवेळी जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे.तसेच पालिकेच्या पथकामार्फत वेळोवेळी तपासणी करून कार्यवाही करण्यात येत आहे. परंतु नागरिक हे दररोज घरातून पिशवी घेऊन निघत नाहीत ते घाईत कामावर निघून जातात व कामावरून घरी जातांना त्यांना भाजीपाला,फळे,पालेभाज्या किंवा इतर साहित्य घेऊन जावे लागत असल्यामुळे ते दुकानदारांना कॅरीबॅगची मागणी करतात. तसेच सदर सिंगल युज प्लास्टिक वर पूर्णतः बंदी असल्यामुळे त्यांना सदर साहित्य घेऊन जाण्यास अडचण निर्माण होत आहेत.
यावर उपाययोजना म्हणून मुख्याधिकारी यांनी शहरात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे सुचविले व ATM क्लोथ बॅग मशीन शहरात मुख्य ठिकाणी बसविण्याचे आदेश दिले. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही व कापडी पिशवी हि योग्य व माफक दरात नागरिकांना उपलब्ध होईल.

























