बार्शी – क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार व शालेय खेळ महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६९ व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये १४ वर्षाखालील गटात महाराष्ट्र विद्यालय बार्शीच्या कु. सान्वी गोरे हिने घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धा रांची (झारखंड) येथे नुकत्याच पार पडल्या.
महाराष्ट्र विद्यालयांमध्ये इयत्ता ७ वी मध्ये शिकणारी कु. सान्वी दत्तात्रय गोरे या खेळाडूने बार्शीचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर उंचावलेले आहे. १४ वर्षाखालील वयोगटामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रतिनिधित्व करत सान्वीने संपूर्ण देशातून आलेल्या स्पर्धकांमधून वैयक्तिक खेळामध्ये प्रथम क्रमांक मिळवत महाराष्ट्र राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच पाचजणांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघास द्वितीय क्रमांक मिळवुन दिला. ही बाब महाराष्ट्र राज्याबरोबरच सोलापूर जिल्हा व बार्शी शहरातील सर्व खेळाडूंसाठी अभिमानास्पद आहे .या यशामध्ये सान्वीच्या पालकांचाही खूप मोठा वाटा आहे. आज सान्वी ही सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरली आहे.
तिच्या उज्वल यशाबद्दल वखारिया विद्यालय उपळे दु.चे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर सर यांनी तिचा सत्कार केला. त्यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील बुद्धिबळ खेळाचे संघ व्यवस्थापक अतुल नलगे सान्वीचे आजोबा, वडील, आई, आजी समवेत सत्कार स्वीकारला.
























