श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त छत्रपती केसरी सोलापूर 2023 चे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान इंदिरा कन्या प्रशाला डाळिंबी आड शिंदे चौक येथे पार पडले.प्रारंभी कुस्ती मैदानचे पुजन महामंडळ ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे चंद्रकांत वानकर पुरुषोत्तम बरडे शिवाजी घाडगे गुरुजी राजाराम दुधाळ श्रीकांत डांगे भाऊसाहेब रोडगे बाळासाहेब पुणेकर माऊली पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
शंभर रुपये पासून लहान कुस्त्यास सुरुवात करण्यात आली. व शेवटची प्रेक्षणीय कुस्ती ठरली ती छत्रपती केसरी सोलापूर 2023 साठी माळशिरसचा पै.सतपाल सोनटक्के विरुद्ध करमाळ्याचा पै.भैरु माने ही कुस्ती झाली. ही कुस्ती अर्धा तास प्रेक्षणीय लढतीनंतर पंचांनी गुणावर लावली त्यामध्ये पै.सतपाल सोनटक्के यांने पै.भैरु मानेवर गुण घेऊन विजय मिळविला.पै.सतपाल यास मान्यवरा हस्ते कै.पै.मुरलीधर घाडगे यांच्या स्मरणार्थ गदा व रोख रक्कम तसेच छत्रपती केसरी सोलापूर 2023 हा किताब देण्यात आला.
हा कुस्ती चा सामना यशस्वी करण्यासाठी बापु जाधव पै.अमर दुधाळ मा.देविदास घुले मा.सचिन स्वामी प्रभाकर भोजरंगे पै.महेश कोळी पै.शैलेश मोरे पै.ज्योतिबा मनसावाले पै.महादेव चव्हाण युवराज शेळके आदींनी परिश्रम