जेऊर – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची वार्ता समजताच जेऊर व चिखलठाण परीसरातील गावात लोकांकडून उस्फुर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला .
परिसरातील चिखलठाण, जेऊर, शेटफळ, केडगाव कुगाव पोफळज या गावातील परिसरात शोककळा पसरली . आज सकाळी नऊ वाजता आमदार नारायण पाटील यांच्या करमाळा तालुका विकास आघाडीचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचार शुभारंभ चिखलठाण येथील कोटलींग मंदीर येथे नारळ फोडून होणार होता निधनाची वार्ता समजताच हा कार्यक्रम कार्यक्रम रद्द करण्यात आला .
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराचे सर्वच पक्ष व उमेदवारांनी कार्यक्रम रद्द करून तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींनी बारामतीकडे धाव घेतली.परिसरात दिवसभर या अपघाताचीच सर्वत्र चर्चा सुरू होती. तालुक्यातील अनेक अजितदादाप्रेमी मंडळींनी बारामती येथे जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.


















