सोलापूर – ह भ प मातोश्री जनाबाई इंगळे यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त दि. 05 ते 08 फेब्रुवारी दु. 2 ते 5 पर्यंत ह भ प सुधाकर इंगळे महाराज यांच्या अमृतवाणीने श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीला आदर्श विचार आणि चरित्र श्रावणाची खूप गरज आहे म्हणून कथा करण्याचा मानस श्री संत मुक्ताई संस्कृतीक प्रतिष्ठान, सोलापूर या संस्थे मार्फत केला आहे.
तसेच दि. 09-02-2026 रोजी स. 10 ते 12 गुलालचे कीर्तन ह भ प चैतन्य महाराज देहूकर (जगद्गुरू तुकाराम महाराज वंशज ) पंढरपूर यांचे होणार असून तदनंतर ह भ प अनंत इंगळे महाराज यांच्या अध्यक्षते खाली आणि ह भ प चैतन्य महाराज देहूकर व ह भ प जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष) यांच्या शुभ हस्ते ” मुक्ताई रत्न जीवन गौरव ” पुरस्कार सोहळा ही आयोजित केला आहे.
” आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया || ” या न्यायाने वारकरी संप्रदायामध्ये ज्या महिलानी व महिला भजनी मंडळानी विशेष योगदान दिले आहे. वारी, सेवा, निष्ठा यांचा समन्वय हाच आदर्श मानून जीवन जगणाऱ्या एका महिलेला व एका महिला भजनी मंडळाला सन्मानित केले जाणार आहे. ह भ प सुभद्राबाई ज्ञानदेव गायकवाड (कोयना नगर ) व रुक्मिणी महिला भजनी मंडळ मित्रनगर, शेळगी (अध्यक्ष अनिता तांबके) यांना दिला जाणार आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार महाराज, गायक, वादक यांचा ही सन्मान करण्यात येणार आहे.
हा सर्व कार्यक्रम श्री संत मुक्ताई मंदिर राजेश कोठे नगर, लक्ष्मी पेठ, सोलापूर येथे केला जाणार असून हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी तानाजी महाराज बेलेराव, किशोर धायगुडे, प्रभाकर ताटे, इ. परिश्रम घेत आहेत अशी माहिती संस्था अध्यक्ष शंकर भोसले यांनी एका पत्रकाद्वारे दिली.

























