Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापौर, उपमहापौर निवडीसाठी महापालिका सज्ज

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महानगरपालिकेत उद्या होणाऱ्या नूतन महापौर व उपमहापौर पदाच्या निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित कार्यालये व सभागृहांची पाहणी केली.

          यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापौर कार्यालय, उपमहापौर कार्यालय, सभागृह नेते कार्यालय तसेच कै. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. उद्या होणाऱ्या निवड प्रक्रियेची तयारी, व्यवस्था, बैठक नियोजन, सभागृहातील आसन व्यवस्था, सुरक्षा व इतर अनुषंगिक बाबींचा आढावा घेण्यात आला.

महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पार पडणार आहे, कायदेशीर तरतुदी, नियमावली तसेच निवड प्रक्रियेदरम्यान घ्यावयाच्या दक्षता याबाबतची सविस्तर माहिती नगर सचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडून आयुक्तांनी घेतली. निवड प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पडावी, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

        महापालिकेच्या लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या या निवड प्रक्रियेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक त्या सुविधा व व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात, असेही आयुक्तांनी यावेळी निर्देशित केले.

            यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकूलवार, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, उपअभियंता प्रकाश दिवानजी, कर संकलन विभाग अधीक्षक युवराज गाडेकर,  विद्युत विभाग अभियंता महादेव इंगळे, सामान्य प्रशासन विभाग अधीक्षक रजाक पेंढारी,  नितीन गायकवाड , मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

हायटेक साऊंड सिस्टीम व्यवस्था ; एआय

माध्यमातून प्रोसिडिंग करण्याची तयारी

महापालिकेच्या सभागृहात एकूण 55 बेंचवर सदस्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बेंचवर एक ते 55 असे नंबर चिटकवण्यात आले आहेत. हायटेक अशी साऊंड सिस्टिम करण्यात आली आहे.

महापौर यांच्या डायस समोरही नवे पाच माईक लावण्यात आले आहेत. हायटेक मिक्सर लावण्यात आला आहे. या मिक्सरला ब्लूटूथ अटॅच आहे. त्याचबरोबर ऑटोमॅटिक रेकॉर्डिंगची ही व्यवस्था आहे. त्या आधारे एआय सिस्टीमच्या माध्यमातून भविष्यात व्हॉइस रेकॉर्डिंग वरून प्रोसिडिंग टाईप करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या सर्व सिस्टिमची यशस्वी चाचणीही आज करण्यात आली. वायफायची ही व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Post Views: 127
Previous Post

महाराजांच्या स्वराज्यसंकल्पनेत पूर्णपणे न्हाऊन निघालेला माणूस म्हणजे ‘बहिर्जी’

Next Post

एक एकरही जिरायत ठेवणार नाही- शहाजीबापू पाटील 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एक एकरही जिरायत ठेवणार नाही- शहाजीबापू पाटील 

ताज्या बातम्या

हम कमिशनर है म्हणणाऱ्या रीलवाल्याचा पोलिसांनी उतरवला माज

May 24, 2026

आरक्षणावर सडेतोड बोलले ओबीसी नेते हाके

May 24, 2026

नाभिक समाजाच्या पुढाकारातून दोन गरीब दाम्पत्याच्या जुळल्या रेशीमगाठी

May 23, 2026

निकाळजेंच्या घरी सांत्वनासाठी पोहोचल्या खा प्रणिती शिंदे

May 23, 2026

श्री शक्ती सेवा समिती सोलापूरच्या वतीने ऐश्वर्या लक्ष्मी सुवर्ण कुबेर महोत्सवात सुवासिनींने केले पूज

May 23, 2026

काँग्रेसचे माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांचे निधन

May 23, 2026

अप्रिय घटना नको, त्वरित पोलिसांना संपर्क साधा ईदसाठी सूचना

May 23, 2026

खरेदी करायला बाहेर गेलेला सुफियान शेख परत आलाच नाही आढळला मृतदेह

May 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0877658

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697