बिलोली – स्वातंत्र्यानंतर संपूर्ण देशामध्ये भौतिक सुविधांचे जाळे विकसित होत असून अनेक शहरे पक्क्या रस्त्यांनी जोडल्या जात आहेत. असे असले तरीही आज ग्रामीण भागातील अनेक गावे अनेक सुविधांपासून वंचित आहेत.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लघुळ (ता. बिलोली) येथे बुधवार (दि.४) पासून बससेवा सुरू झाली. आमदार जितेशजी अंतापूरकर, संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, डॉ. जयंत जकाते, गणेश पाटील, सुनील देशमुख, व्यंकट बामणे, प्रभू मुत्तेपोड, सतीश गोड, श्रीनिवास दम्मय्यावार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सेवेचा शुभारंभ झाला.
लहूळ हे तालुक्यापासून काही अंतरावर असलेले गाव परंतु येथे आजतागायत शासनाची कुठल्याही प्रकारची प्रवासी वाहतूक सेवा नव्हती. ही सेवा सुरू करण्याकरिता तब्बल ७५ वर्ष म्हणजे तीन पिढ्यांना वाट पाहावी लागली. लघुळ पासून तालुक्याचे ठिकाण बिलोली हे केवळ ६ किलोमीटर अंतरावर तर दुसरीकडे सगरोळीसारखी मोठी बाजारपेठ परंतु लघुळवासीयांना सगरोळी व बिलोली येथे जाण्याकरिता केवळ खाजगी व वैयक्तिक वाहनांशिवाय पर्याय नव्हता. सगरोळी येथे मोठे शिक्षण संकुल कार्यरत असून विद्यार्थ्यांना देखील पायी अथवा खाजगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असे. अनेकवेळा मागणी झाली परंतु प्रवासी संख्या व अर्थकारण यामुळे लघुळवासीयांना तब्बल पंच्याहत्तर वर्ष बससेवेची वाट पहावी लागली अखेर बिलोली, लघुळ, सगरोळी अशी बस सेवा सुरू झाली.
नाल्यावरील अरुंद पुलामुळे सेवेत व्यत्यय
बिलोली–लघुळ–सगरोळी अशी बस सेवा सुरू करण्यात आली असली तरीही सगरोळी येथील विठ्ठल मंदिराजवळील तलावाच्या सांडव्यावरील पूल पूर्णतः मोडकळीस आला असून या अरुंद पुलामुळ



















